Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Rohit Sharma: रोहितमुळे भारताने अंडर-19 चा वर्ल्डकप गमावला? काय आहे नेमकं प्रकरण?

वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर चाहते फारच निराश होते. हे दुःख विसरत असताना अंडर-19 वर्ल्डकपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने युवा टीम इंडियाचा पराभव करत भारतीयांच्या जखमेवर जणून मीठ चोळलं. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यामध्ये 79 रन्सने टीम इंडियाच्या युवांचा पराभव झाला. दरम्यान या पराभवाला देखील चाहत्यांनी रोहित शर्माला ( Rohit Sharma )  जबाबदार धरलंय. नेमकं हे प्रकरणं काय आहे, जाणून घेऊया. 

Rohit Sharma: रोहितमुळे भारताने अंडर-19 चा वर्ल्डकप गमावला? काय आहे नेमकं प्रकरण?

Rohit Sharma: वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर चाहते फारच निराश होते. हे दुःख विसरत असताना अंडर-19 वर्ल्डकपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने युवा टीम इंडियाचा पराभव करत भारतीयांच्या जखमेवर जणून मीठ चोळलं. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यामध्ये 79 रन्सने टीम इंडियाच्या युवांचा पराभव झाला. दरम्यान या पराभवाला देखील चाहत्यांनी रोहित शर्माला ( Rohit Sharma )  जबाबदार धरलंय. नेमकं हे प्रकरणं काय आहे, जाणून घेऊया. 

रोहित शर्माला धरलं जातंय जबाबदार

गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यानंतर वनडे वर्ल्डकप आणि आता अंडर-19 वर्ल्डकपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली आहे.  त्यानंतर आता चाहते यासाठी भारतीय संघाचा वरिष्ठ कर्णधार रोहित शर्माला जबाबदार धरतायत. रोहित शर्मामुळे ( Rohit Sharma )  भारताने अंडर-19 वर्ल्डकपचं विजेतेपद गमावल्याचं चाहत्यांचे म्हणणे आहे.

पराभवानंतर ट्रोल झाला रोहित शर्मा?

अंडर-19 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma ) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma )  नेतृत्वाखाली टीम इंडियाने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप आणि वनडे वर्ल्डकप गमावल्या, ज्यामुळे चाहते नाराज आहेत. अशातच रोहित शर्माने ( Rohit Sharma )  अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी ट्विट करून टीम इंडियाला मोटीवेट केल्याने चाहते संतापले. चाहत्यांचे म्हणणे आहे की, रोहित शर्मा पनवती असून त्याच्या ट्विटमुळे भारताला अंडर-19 चे विजेतेपदही गमवावं लागलं आहे.

टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या खेळल्या गेलेल्या अंडर -19 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या दिलेल्या 254 धावांचं आव्हान पार करताना टीम इंडिया पत्त्यासारखी ढासळली. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला 254 धावा करणं गरजेचं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी टीम इंडियाचा पराभव केला अन् 14 वर्षानंतर अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.

Read More