Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs WI: रोहित शर्मा, विराट कोहली रेकॉर्ड्सच्या उंबरठ्यावर, आज मोठे विक्रम रचण्याची शक्यता

IND vs WI: विराट कोहलीला (Virat Kohli) एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) 13 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 102 धावांची गरज आहे. दरम्यान सध्या विराटचा फॉर्म पाहता आजच्या सामन्यात या रेकॉर्डला गवसणी घालण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रोहित शर्माही एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे.   

IND vs WI: रोहित शर्मा, विराट कोहली रेकॉर्ड्सच्या उंबरठ्यावर, आज मोठे विक्रम रचण्याची शक्यता

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता एकदिवसीय मालिकाही जिंकण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघ आज वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. आगामी वर्ल्डकपच्या निमित्ताने भारतीय संघासाठी ही रंगीत तालीम असून मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, या सामन्यात सर्वांचं लक्ष भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या कामगिरीकडे असेल. किंग्स्टन ओव्हल मैदानात हा सामना होणार असून भारतीय स्टाऱ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठे रेकॉर्ड रचण्याची शक्यता आहे. 

विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 102 धावांची गरज आहे. दरम्यान, विराट कोहली सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता आज तो सहजपणे या रेकॉर्डला गवसणी घालण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही आज आपल्या नावे नवा विक्रम रचण्याची संधी आहे. रोहितला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 175 धावांची गरज आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याचा भीमपराक्रम याआधी केला आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यातच हा रेकॉर्ड पूर्ण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

भारतीय संघातील अनेक अनेक खेळाडू जखमी आहेत. यामुळे वेस्ट इंडिजविरोधातील मालिकेत संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि उमरान मलिक यांना संधी मिळाली असून, चांगली खेळी केल्यास ते भारतीय संघातील आपलं स्थान निश्चित करु शकतात. 

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर असल्याने मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शून्याची हॅट्ट्रिक नोंदवूनही सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. वर्ल्डकपआधी होणाऱ्या या सामन्यांमध्ये चांगली खेळी करत खेळाडूंना संधीचं सोनं करण्याची वेळ आहे. 

वेस्ट इंडिज संघ: 

शाई होप (w/c), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, शिमरॉन हेटमायर, अॅलिक अथनाझ, रोव्हमन पॉवेल, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, ओशाने थॉमस, जयडेन सील्स, केविन सिंक्लेअर, डॉमिनिक ड्रेक्स, यॅनिक

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (w), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर , अक्षर पटेल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड

Read More