Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय

New Indian Captain: बीसीसीआयच्या (BCCI) हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला मोठा दणका बसलाय. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सामने खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

IND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ?  BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय

IND vs SL T20 Series: बांग्लादेश दौऱ्यानंतर असलेल्या टीम इंडियाची (Team India) दमदार कामगिरीमुळे युवा खेळाडूंवरचा विश्वास आणखीन वाढत असल्याचं दिसतंय. बांग्लादेश दौऱ्यानंतर (IND vs BAN) टीम इंडियाला 3 जानेवारीपासून (IND vs SL) श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय (T20) मालिका, तसेच 3 सामन्यांची वनडे (ODI) मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 3 जानेवारी ते 7 जानेवारीमध्ये खेळवण्यात येणार आहे. नववर्षात श्रीलंकेविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार (Captain of Team India) अचानक बदलणार असल्याची शक्यता आहे. (IND vs SL Hardik Pandya Is Expected To Captain Team India In Home T20I Series Against Sri Lanka marathi news)

बीसीसीआयच्या (BCCI) हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला मोठा दणका बसलाय. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सामने खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यानंतर आता आगामी टी-20 मालिकेत स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो. अशातच आता बीसीसीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे.

टी-ट्वेंटी वर्ल्ड (T20 World Cup) कपमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये (Selection Committee) मोठे बदल केले गेले. त्यानंतर नवीन समिती स्थापन करण्यात आली. त्यामुळे आता टी-20 आणि वनडे कर्णधार (New Captian Team India) बदणार असल्याची शक्यता आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, यावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा - IPL 2023 Auction : 'ही' 5 नावं लक्षात ठेवा, यांच्यावर पडणार पैशांचा पाऊस?

दरम्यान, भारताचा टी-ट्वेंटी संघ पूर्णपणे बदलला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नव्या टीमचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्या (Captain hardik Pandya) असण्याची शक्यता आहे. तर के एल राहूलचं (KL Rahul) काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुन्हा संधी मिळणार का?, असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.

Read More