Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास

India Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक (Smriti Mandhana Century) ठोकलंय.

IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास

Smriti Mandhana Century : भारतीय वुमेन्स क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका वुमेन्स (India Women vs South Africa Women) यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जातीये. या सिरीजमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची स्मृती मानधानाने झुंजावती शतक झळकावलं आहे. स्मृतीने 120 बॉलमध्ये 136 धावांची खेळी केली. यामध्ये तिने 18 फोर अन् 2 खणखणीत सिक्स मारले. तर याच सामन्यात हरमनप्रीत कौरने देखील 103 धावांची खेळी केली. स्मृतीने करियरमधील 7 वं शतक झळकावलं. याचबरोबर तिने बड्या रेकॉर्डला गवासणी (Most Odi Ton in Indian Women Cricket) घातलीये.

स्मृती मानधनाने टीम इंडियाची माजी कॅप्टन मिताली राज (Smriti Mandhana Equals Mithali Raj Century) हिच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मिताली राजने 232 सामन्यात 7 शतकं झळकावली होती. मात्र, स्मृतीने केवळ 84 सामन्यात 7 सेंच्युरी ठोकल्या आहेत. तर स्मृतीने पाच इतर महिला खेळाडूंच्या रेकॉर्डची बरोबरी केलीये. स्मृती मानधना आणि मिताली राज यांच्याशिवाय वेस्ट इंडिजची स्टॅफनी टेलर, न्यूझीलंडची एमी सॅटरथवेट, इंग्लंडची सारा टेलर आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड यांनी प्रत्येकी 7 शतके झळकावली आहेत.  

कॅप्टन कौरचा तडाखा

स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी तिसऱ्या विकेट्ससाठी 171 धावांची विक्रमी भागीदारीही केली. हरमनप्रीतने दुसऱ्या बाजूने विकेट पडू दिली नाही आणि धावांचा डोंगर रचला. हरमनप्रीतने 88 चेंडूत 103 धावा केल्या. त्यात 9 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. टीम इंडियाने दुसऱ्या वनडे सामन्यात 325 धावा उभ्या केल्या.

दक्षिण आफ्रिका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, नॉन्डुमिसो शांगासे, मिके डी रिडर (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा आणि अयाबोंगा खाका.

टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता,  जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना.

Read More