Sachin Tendulkar On Virat kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) याने रविवारी वाढदिवसादिवशी वनडे कारकिर्दीतील 49 वं झळकावलं. वनडे विश्वचषक (World Cup 2023) मधील 37 वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात विराटने संयमी खेळी करून शतक ठोकलं (Virat kohli 49th Century) अन् टीम इंडियाला 300 चा टप्पा पार करून दिला. आजच्या सामन्यात विराटने सचिन तेंडूलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. कोहलीच्या या किंग साईज खेळीमुळे सचिन देखील प्रभावित झाला आहे. सचिनने (Sachin Tendulkar) पोस्ट करत विराटचं कौतूक केलंय. त्याचबरोबर विराटकडे एक मागणी देखील केलीये.
विराट तू चांगला खेळला. मला 49 शतकांवरून 50 शतकांवर जाण्यासाठी मला 365 दिवस लागले. मला आशा आहे की तू 49 वरून लवकरात लवकर 50 वर जाशील आणि पुढील काही दिवसात माझा विक्रम मोडशील, असं म्हणत सचिनने (Sachin Tendulkar On Virat kohli ) विराटकडे वर्ल्ड कपमध्येच 50 व्या शतकाची मागणी केली आहे.
Well played Virat.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 5, 2023
It took me 365 days to go from 49 to 50 earlier this year. I hope you go from 49 to 50 and break my record in the next few days.
Congratulations!!#INDvSA pic.twitter.com/PVe4iXfGFk
टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.