Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Virat Kohli | कॅप्टन विराट कोहलीचा 'ले पंगा', डायरेक्ट अंपायरशी भिडला, नक्की काय झालं?

विराट कोहली (Virat Kohli) थेट अंपायरसोबत (Umpire Marais Erasmus) भिडला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Virat Kohli | कॅप्टन विराट कोहलीचा 'ले पंगा', डायरेक्ट अंपायरशी भिडला, नक्की काय झालं?

केपटाऊन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (IND vs Sa 3rd Test) खेळवण्यात येत आहे. या तिसऱ्या सामन्याचा आजचा (12 जानेवारी) दुसरा दिवस आहे. या संपूर्ण मालिकेत काही वादग्रस्त निर्णायांमुळे अंपायर्स आधीच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. अशातच अंपायरच्या आणखी एका कृतीमुळे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli Angry) भलताच नाराज झाला. या सर्व प्रकारामुळे विराटचा स्वत:वरचा ताबा सुटला. विराट थेट अंपायरसोबत भिडला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (ind vs sa 3rd test day 2 team india captain virat kohli angry on field umpire marais erasmus due to given his mohammed shami warning about bowling danger zone at newlands cape town) 

नक्की काय झालं? 

सामन्यातील दुसऱ्या दिवसातील पहिलं सत्र सुरु होतं. मोहम्मद शमी बॉलिंग करत होता. तेव्हा फिल्ड अंपायर मारेस इरास्मस (Field Umpire Marais Erasmus) यांनी शमीला इशारा दिला. अंपारयनुसार, शमी हा डेंजर झोनमध्ये येऊन बॉलिंग करत होता. त्यामुळे अंपायरने शमीला टोकलं. 

यानंतर शमी नक्की डेंजर झोनमध्ये बॉलिंग करत होता का, हे पाहण्यासाठी रिप्ले दाखवण्यात आला. मात्र या रिप्लेमध्ये शमी डेंजर झोनमध्ये बॉलिंग करत नसल्याचं दिसून आलं. मग काय, विराट संतापला. विराट फिल्डिंग पोजिशनवरुन फिल्ड अंपायरच्या दिशेने गेला. यावेळेस विराटने अंपायरला चांगलंच सुनावलं. हा व्हीडिओ आता व्हायरलं होतोय. हा सर्व प्रकार आफ्रिकेच्या डावातील 13 व्या ओव्हरमध्ये घडला.  

डेंजर झोन म्हणजे काय? 

पीचच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 3 स्टंप्स असतात. या स्टंपसच्या रांगेत येऊन बॉलिंग करायची नसते. मात्र काही वेळा गोलंदाजांकडून अनावधनाने फॉलोअप दरम्यान डेंजर झोनमध्ये येतात. अशावेळेस अंपायर त्या बॉलरला याची कल्पना देतात. बॉलरने पुन्हा अशी चूक केल्यास, अंपायर त्या बॉलरला हटवू शकतो.   

 

Read More