Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs NZ: विराटचा संघर्ष सुरुच, बोल्टचं स्वप्न पूर्ण!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली आहे.

IND vs NZ: विराटचा संघर्ष सुरुच, बोल्टचं स्वप्न पूर्ण!

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये १८३ रननी पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये तिसऱ्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर १४४/४ एवढा आहे. दुसऱ्या इनिंगमध्येही भारताचा कर्णधार विराट कोहलीला अपयश आलं आहे. ट्रेन्ट बोल्टने विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

वेलिंग्टनमधली ही टेस्ट मॅच सुरु होण्याआधीच बोल्टने मी विराटसारख्या खेळाडूंना आऊट करण्यासाठीच खेळतो, असं वक्तव्य केलं आहे. आता दुसऱ्या इनिंगमध्ये विराटची विकेट घेऊन बोल्टने त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. बोल्टने बाऊन्सर टाकून विकेट कीपर बीजे वॉटलिंगकडून विराटला माघारी धाडलं.

विराटने या इनिंगमध्ये फक्त १९ रन केले. पहिल्या इनिंगमध्ये विराट २ रन करुन आऊट झाला होता. तर याआधी बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये विराटने १३२ रनची खेळी केली होती, पण टेस्ट क्रिकेटमध्ये विराटचं सातत्य हरवल्याचं आकडे सांगत आहेत.

विराट कोहलीने २०१८ साली भारताच्या इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये ५९३ रन केले होते. त्या सीरिजमध्ये भारताचा ४-१ने पराभव झाला होता. यानंतर विराटने भारताबाहेर खेळलेल्या १४ इनिंगमध्ये फक्त एकच शतक केलं आहे.

इंग्लंड दौऱ्यानंतर विराटने ६ टेस्ट मॅच (ही मॅच सोडून)मध्ये ३८च्या सरासरीने फक्त ४१८ रन केले आहेत. यादरम्यान विराटने फक्त पर्थमध्ये २०१८ साली शतक केलं. पर्थमध्ये विराटने १२३ रन केले होते. मागच्या २ वर्षातला टेस्टमधला विराटचा परदेशातला हा सर्वाधिक स्कोअर आहे.

विराट कोहली क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमध्ये सध्या संघर्ष करताना दिसत आहे. तिन्ही फॉरमॅटच्या मागच्या ९ इनिंगमध्ये विराटला फक्त एकच अर्धशतक करता आलं आहे.

Read More