Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs NZ | न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका

 पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

IND vs NZ | न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका

मुंबई : टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडला टी 20 मालिकेत क्लीन स्वीप दिला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी 20 मालिकेत 3-0 ने पराभूत केलं. यानंतर पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या (Ajnikya Rahane) नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार सलामीवीर फलंदाज के एल राहुलला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो कसोटी मालिकेला मुकणार आहे.  बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ind vs nz test series 2021 team india staropener k l rahul has ruled out of 1st test against new zeland due to injurey)

केएलच्या जागी सूर्याला संधी

केएलच्या डाव्या मांडीच्या स्नायूचा त्रास अजूनही कायम आहे. त्यामुळे त्याने या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. केएलच्या जागी मुंबईकर सूर्यकुमार यादवला संधी मिळाली आहे. सूर्याला कसोटी मालिकेत संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर ती चर्चा खरी ठरली आहे. या संधीमुळे सूर्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार आहे. 

पहिल्या कसोटीसाठी रहाणेकडे नेतृत्व

पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा असणार आहे. विश्रांतीनंतर  दुसऱ्या कसोटीत विराट संघासोबत जोडला जाणार आहे.

तिघांना कसोटी पदार्पणाची संधी

बीसीसीसीआयने या कसोटी मालिकेसाठी तिघांना संधी दिली आहे. यामध्ये श्रेयस अय्यर, केएस भरत आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळाली आहे.   
 
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (रिझर्व्ह विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्द कृष्णा.

टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड टीम | केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेवेन कॉनवे, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), हेनरी निकोल्स, रॉस टेलर, विल यंग, रचिन रविंद्र, टीम साउदी, कायले जेमीन्सन, नील वॅगनर, मिचेल सँटनर, ऐजाज पटेल, विल समरविल आणि ग्लेन फिलिप्स.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर.   

दुसरी कसोटी, 3 ते 9 डिसेंबर, मुंबई. 

Read More