Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs NZ 3rd T20 : पावसामुळे खेळ थांबला, भारत 75/4, DLS नियमानुसार काय निकाल लागणार?

IND vs NZ 3rd T20 : पावसामुळे DLS नियमानुसार काय निकाल लागणार? कोणत्या संघाला फायदा होणार? 

IND vs NZ 3rd T20 : पावसामुळे खेळ थांबला, भारत 75/4, DLS नियमानुसार काय निकाल लागणार?

IND vs NZ 3rd T20 : न्यूझीलंडने दिलेल्या 161 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाच्या (Team India) 4 विकेट गमावून 75 धावाच झाल्या आहेत. मात्र मॅच दरम्यानचं पाऊस पडल्याने खेळ थांबला आहे. आता (DLS) डकवर्थ लुईस नियमानुसार  या सामन्याचा निकाल लागणार आहे. जर या सामन्याचा निकाल भारताच्या पक्षात लागला नाही, तर क्रिकट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे.  

हे ही वाचा : टीम इंडियाची भेदक गोलंदाजी, न्यूझीलंडचा धाव इतक्या धावांवर आटोपला 

न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार टिम साउदीने (TIm Southee) टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्युझीलंडचा डाव 160 धावांवर आटोपला होता. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने आणि अर्शदिप सिंहने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या आहेत. तर हर्षल पटेलने 1 विकेट घेतली आहे. 

हे ही वाचा : ऑस्ट्रेलियन खेळाडूच मैदानावर अनोख सेलिब्रेशन, VIDEO झाला व्हायरल 

न्युझीलंडने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नव्हती. ईशान किशन 10, रिषभ पंत 11, सुर्यकुमार 12, अय्यर शुन्य धावावर बाद झाले होते. हार्दीक पंड्या 30 आणि दिपक हुंडा 9 धावावर नाबाद आहेत. भारताची धावसंख्या 4 विकेट गमावून 75 धावावर पोहोचली. या सामन्याच्या मध्येच पाऊस सुरु झाला. त्यामुळे आता खेळ थांबला आहे. आता हा खेळ पुन्हा सुरु होण्याची शक्यताही कमी दिसत आहे. 

तर सामना टाय होणार 

टीम इंडियाच्या बॅटींग दरम्यानचा पावसाला सुरूवात झाली आहे. तसेच आता सामना पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाचा स्कोर न्यूझीलंडच्या बरोबरीत आहे. जर सामना पुन्हा सुरू झाला नाही तर तो टाय घोषित केला जाईल.

दरम्यान डकवर्थ लुईस नियमानुसार दोन्ही संघाचा स्कोअरही बरोबरीत होता. त्यामुळे सामना अखेर बरोबरीत सुटला. त्यामुळे टीम इंडियाने 1-0 फरकाने मालिका जिंकली आहे.  

न्यूझीलंड प्लेइंग-XI : टिम साउथी (कर्णधार), फिन एलन, डेवोन कॉनवे (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, डेरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सैंटनर, एडम मिल्ने, ईश सोढ़ी, आणि लॉकी फर्ग्युसन

टीम इंडिया प्लेइंग-XI : ईशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल

Read More