Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs NZ 2nd Test | कॅप्टन विराट कोहलीच्या नावे आणखी एक विक्रम, पण नको असलेला

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 2nd Test) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. 

IND vs NZ 2nd Test | कॅप्टन विराट कोहलीच्या नावे आणखी एक विक्रम, पण नको असलेला

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 2nd Test) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या (Captain Virat Kohli) नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. विराट पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. यासह त्याच्या नावे नको असलेला विक्रम झाला. (ind vs nz 2nd test team india captain virat kohli 10 th time out on ducks)     

काय आहे रेकॉर्ड? 

विराट कोहली कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 10 वेळा शून्यावर बाद झाला आहे. विराट सर्वाधिक 10 वेळा शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम हा न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगच्या नावे आहे. 

फ्लेमिंग कर्णधार म्हणून सर्वाधिक 13 वेळा आऊट झाला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा हेन्सी क्रोनिए इंग्लडचा मायकल अर्थटन आणि महेंद्रसिंह धोनी संयुक्तरित्या एकाच स्थानावर आहे. हे तिघेही एकूण 8 वेळा डक आऊट झाले आहेत. 

सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे कसोटी कर्णधार

स्टीफन फ्लेमिंग - 13 (न्यूझीलंड)

ग्रेम स्मिथ - 10 (दक्षिण आफ्रिका)

विराट कोहली - 10 (टीम इंडिया)

हॅन्सी क्रोनिए - 8 (दक्षिण आफ्रिका)

मायकल अर्थटन 8 (इंग्लंड)

महेंद्रसिंह धोनी 8 (टीम इंडिया)

विराटला बाद देण्यावरुन वाद

दरम्यान विराटला बाद देण्याच्या निर्णयावरुन वाद पेटला. विराटला वादग्रस्तरित्या आऊट देण्यात आलं. एजाज पटेल (Azaz Patel) 30 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्ये शेवटच्या चेंडूवर एझाजने एलबीडबल्यूची जोरदार अपील केली. फील्ड अंपायर अनिल चौधरीने (Anil Choudahry)  विराटला बाद घोषित केलं. 

विराटने या निर्णायला आव्हान देत रिवीव्ह्यू घेतला. आता विराट आऊट आहे की नाही हे थर्ड अंपायर (Third Umpire Virender Sharma) वीरेंद्र शर्मा सांगणार होते.

बॉल आधी बॅटला लागला. त्यानंतर जाऊन पॅडला लागला. थर्ड अंपायरने आवश्यक तेवढा वेळ घेतला. त्यांनी दिलेला निर्णय हा धक्कादायक होता. कॉमेंटटरनाही या निर्णायामुळे धक्का बसला. 

फिल्ड अंपायरने दिलेला निर्णय थर्ड अंपायरनेही कायम ठेवत विराटला बाद ठरवंलं. यानंतर विराट फिल्ड अंपायरच्या दिशेने गेला. दोघांनी फार चर्चा केली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. विराटने अखेर मैदानाबाहेरचा रस्ता धरला. या निर्णयामुळे संताप व्यक्त केला जातोय. 

Read More