Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs IRE 1st T20: टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'या' दोन खेळाडूंचा डेब्यू, जसप्रीत बुमराह म्हणतो...

Ireland vs India, 1st T20I: आशिया चषकाला येत्या 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. 

IND vs IRE 1st T20: टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'या' दोन खेळाडूंचा डेब्यू, जसप्रीत बुमराह म्हणतो...

IND vs IRE 1st T20: आशिया चषकाला येत्या 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना डब्लिन येथे होणार आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून मालिकेत विजयी सुरुवात करण्याचं ध्येय असेल. अशातच आता पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर प्रसिद्ध कृष्णा आणि रिंकू सिंह यांचा आज डेब्यु सामना असणार आहे. 

पाहा प्लेईंग XI

आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): पॉल स्टर्लिंग (C), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (WK), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

भारत (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (WK), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (C), रवी बिश्नोई.

काय म्हणतो जसप्रीत बुमराह?

आम्ही प्रथम गोलंदाजी करू, इंथे आल्याचा खूप आनंद झाला. इथलं हवामान सुंदर दिसतंय. मला बरं वाटतंय आणि मी क्रिकेट खेळायला उत्सुक आहे. आपण काय गमावत आहात याची जाणीव होते, परत आल्याने खूप आनंद झालाय. आम्हाला आयर्लंडकडून लढतीची अपेक्षा आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून मला आशा आहे की खेळपट्टी काहीतरी चमत्कार दाखवेल. टीम इंडियाकडून रिंकू आणि प्रसिद्ध कृष्णा असे दोन पदार्पण आहेत. त्यांना फक्त त्यांच्या क्रिकेटचा आनंद घेण्यास सांगितलं, असं बुमराह म्हणतो.

Read More