Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अजिंक्य रहाणे याचे उपकर्णधार जाण्याची शक्यता! हे 3 खेळाडू नवे उपकर्णधाराच्या शर्यतीत

IND vs ENG: अजिंक्य रहाणेला लवकरच संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून टाकले जाऊ शकते! हे 3 खेळाडू नवे उपकर्णधार होऊ शकतात

अजिंक्य रहाणे याचे उपकर्णधार जाण्याची शक्यता! हे 3 खेळाडू नवे उपकर्णधाराच्या शर्यतीत

मुंबई : Cricket News IND vs ENG:  भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यासाठी सध्याचा काळ चांगला नाही. तो सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममधून जात आहे. एकेकाळी भारताला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणारा अजिंक्य रहाणे आज स्वतः मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. जर हे असेच सुरू राहिले, तर लवकरच रहाणेला संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते. नवा खेळाडू संघाचा उपकर्णधार होण्याची शक्यता आहे. जे तीन खेळाडू रहाणेऐवजी संघाचे उपकर्णधार होऊ शकतात.

रोहित शर्मा

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याला आता कसोटी संघातही हे काम करावे लागेल. विराट कोहली याच्या अनुपस्थितीत रोहितने अनेक वेळा संघाची कमानही सांभाळली आहे आणि त्याप्रसंगी त्याने बरेच यशही मिळवले आहे. अनेक दिग्गज आणि लोक असेही मानतात की विराटऐवजी रोहितला संघाचा कर्णधार केले पाहिजे. आयपीएलमध्ये आपल्या टीम मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेता बनवणारा रोहित लवकरच भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार होऊ शकतो.

केएल राहुल

केएल राहुल (KL Rahul) हा असा खेळाडू आहे, ज्याला संघातील प्रत्येक क्रमांकावर फलंदाजी देण्यात आली आहे आणि तो प्रत्येक वेळी यशस्वी झाला आहे. मर्यादित षटकांचे क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेट, राहुलने नेहमीच आपले काम चांगले केले आहे. राहुल इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि त्याने एक शतक आणि अर्धशतक झळकावले आहे. आयपीएलमध्येही राहुल गेल्या काही वर्षांपासून किंग्स 11 पंजाबचे नेतृत्व करत आहे. अशा स्थितीत रोहितनंतर दुसरा दावेदार आहे जो उपकर्णधार होऊ शकतो.

ऋषभ पंत

भारतीय संघाचा सर्वात मोठा सामना विजेता ऋषभ पंत (Rishabh Pant) याने काही वर्षांत संघातील आपले स्थान पूर्णपणे पक्के केले आहे. दिग्गजांचा असाही विश्वास आहे की, येत्या काळात पंत यष्टीरक्षक म्हणून अनेक विक्रम मोडू शकतो. पंतची बॅट घरी आणि बाहेर खूप काही सांगून जाते. या व्यतिरिक्त, त्याने यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदही भूषवले आहे आणि त्याचा संघ गुणतालिकेत सर्वात वर आहे. ऋषभ पंत याला संधी मिळाली तर तो भारताच्या कसोटी संघाचा कर्णधारही होऊ शकतो.

Read More