Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs BAN : शार्दुल ठाकूरने नागिन डान्सचे उत्तर दिले चित्तासन'ने

  निदाहास ट्रॉफीची फायनल मॅच... भारत विरूद्ध बांगलादेश... भारताने टॉस जिंकला... बॉलिंग घेतली... बॅटिंग आली बांग्लादेशची.. जलद सुरूवात... पण तीन विकेट झटपट गेले... पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली बांग्ला इनिंग... एका नंतर एक... पहिला बाद झाला ओपनर लिटन दास वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर... 

IND vs BAN : शार्दुल ठाकूरने नागिन डान्सचे उत्तर दिले चित्तासन'ने

मुंबई :  निदाहास ट्रॉफीची फायनल मॅच... भारत विरूद्ध बांगलादेश... भारताने टॉस जिंकला... बॉलिंग घेतली... बॅटिंग आली बांग्लादेशची.. जलद सुरूवात... पण तीन विकेट झटपट गेले... पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली बांग्ला इनिंग... एका नंतर एक... पहिला बाद झाला ओपनर लिटन दास वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर... 

मग आले सामन्याचे पाचवे षटक... चेंडू युजवेंद्र चहलच्या हातात... समोर ओपनर तमीम इकबाल... पहिला चेंडू खेळला पण दुसऱ्यावर जोश चढला... पुढे येऊन लॉन्ग ऑनला चेंडू उंच टोलावला... त्यानंतर हा षटकार असल्याचे सर्वांना ठाऊक होते. पण बाउंड्री आणि चेंडूच्यामध्ये अचानक एक चित्ता आला... आणि त्याने त्या चेंडूकडे झेप घेतली आणि कॅच पकडला. 

या चित्त्याचे नाव आहे शार्दुल ठाकूर... काय कॅच घेतला... अद्भूत... अविश्वनीय याला चित्तासन म्हटले तर काय चुकीचे आहे.  तुम्ही हा कॅच पाहायलाच पाहिजे... 

 

या सामन्यातील हा सर्वात अप्रतिम कॅच होता. 

Read More