Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs Ban : बांगलादेशाच्या शेवटच्या जोडीने रडवलं; भारताच्या तोंडातला घास हिसकावला

आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. या विजयाने बांगलादेशाने 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये (IND vs BAN 1st ODI ) 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Ind vs Ban : बांगलादेशाच्या शेवटच्या जोडीने रडवलं; भारताच्या तोंडातला घास हिसकावला

IND vs BAN 1st ODI : टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेश (IND vs BAN) दौऱ्यावर गेली आहे. आज या दोन्ही देशांमध्ये पहिला वनडे सामना खेळवण्यात आला. पहिल्याच सामन्यात बांगलादेशाने टीम इंडियाचा पराभव केलाय. अवघ्या एका विकेट्सने टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. या विजयाने बांगलादेशाने 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये (IND vs BAN 1st ODI ) 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

बांगलादेशाच्या शेवटच्या फलंदाजांची उत्तम कामगिरी 

बांगलादेशाच्या टीमच्या शेवटच्या जोडीने टीम इंडियाला रडवलं. आजच्या सामन्यात कर्णधार लिटन दासने सर्वाधिक म्हणजेच 41 रन्स केले. तर मेहदी हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांनी भारताचा विजय हिसकावून घेतला. तर शकीब-अल-हसनने 29 रन्सची खेळी केली.

भारतीय फलंदाजांची कामगिरी

पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यांसारखे ढेपाळले. भारताने बांगलादेशासमोर अवघ्या 187 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून केवळ उपकर्णधार के.एल राहुलला (KL.Rahul) चांगली आणि मोठी खेळी खेळणं शक्य झालं.

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर बांगलादेशाच्या दौऱ्यावर वनडे टीममध्ये वरीष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला. मात्र कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडू बांगलादेशाच्या गोलंदाजांसमोर चांगली कामगिरी करू शकले नाही. यावेळी न्यूझीलंडमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या श्रेयर अय्यरलाही आजच्या सामन्यात साजेसा खेळ करता आला नाही.

Read More