Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs BAN : शुभमन गिलची बॅट तळपली, बांगलादेशविरूद्ध ठोकलं दमदार शतक

IND vs BAN Shubman gill Century : बांगलादेशविरूद्धच्या (India vs Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शुभमन गिलने (Shubman gill) शतक ठोकलं आहे. 148 बॉलमध्ये त्याने हे शतकीय खेळी केली आहे

 IND vs BAN : शुभमन गिलची बॅट तळपली, बांगलादेशविरूद्ध ठोकलं दमदार शतक

IND vs BAN Shubman gill : टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman gill) शतक ठोकले आहे. बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने हे शतक ठोकले आहे. टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात त्याने शतकीय पारी खेळलीय. त्याच्या या उत्कृष्ट खेळीने टीम इंडिया विजयाच्या आणखीण नजीक पोहोचलीय. 

बांगलादेशविरूद्धच्या (India vs Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शुभमन गिलने (Shubman gill) शतक ठोकलं आहे. 148 बॉलमध्ये त्याने हे शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 10 फोर आणि 2 सिक्स मारले आहेत. या त्याच्या खेळीने टीम इंडियाने दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेतली आहे.  

टीम इंडियाचा पहिला डाव 

चट्टोग्राम कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या डावात 404 धावा करता आल्या. चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 90 धावा तर श्रेयस अय्यरने 86 आणि रविचंद्रन अश्विनने 58 धावांचे योगदान दिले. या तीन फलंदाजांशिवाय पंतने 46 आणि कुलदीप यादवने 40 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज आणि तैजुल इस्लाम यांनी सर्वाधिक 4-4 विकेट घेतले. 

शुभमन गिलला टीम इंडियाच्या पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नव्हती. त्याला निव्वळ 20 धावावर बाद व्हावे लागले होते. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती. ही अपेक्षा त्याने दुसऱ्या डावात पुर्ण केली. त्याने दुसऱ्या डावात 148 बॉलमध्ये शतकीय खेळी केली. या त्याच्या खेळीने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 200 धावा पुर्ण केल्या आहेत. तर टीम इंडियाची 450 धावांचे लीड झाले आहे. आता टीम इंडिया दुसरा डाव कधी घोषित करते, हे पाहावे लागणार आहे. 

 

Read More