Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित शर्मा खेळणार का? विराटने दिलं हे उत्तर

भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी आणि शेवटची वनडे आज बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे.

रोहित शर्मा खेळणार का? विराटने दिलं हे उत्तर

बंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी आणि शेवटची वनडे आज बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे. सीरज १-१ने बरोबरीत असल्यामुळे ही मॅच निर्णायक ठरणार आहे. दुसऱ्या वनडेमध्ये फिल्डिंग करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर लगेचच रोहित शर्मा मैदानाबाहेर गेला आणि परत फिल्डिंगला आला नाही. त्यामुळे रोहित शर्मा तिसरी मॅच खेळणार का नाही? याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या दुखापतीवर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित तिसरी वनडे खेळेल अशी अपेक्षा आहे. दुखापत गंभीर असल्याचे कोणतेही संकेत नाहीत, असं विराट कोहली दुसऱ्या वनडेनंतर म्हणाला.

फिल्डिंग करत असताना ४३व्या ओव्हरला रोहित शर्माला सीमारेषेवर बाऊंड्री अडवत असताना दुखापत झाली. रोहितने या मॅचमध्ये ४४ बॉलमध्ये ४२ रनची खेळी केली. शिखर धवन, विराट कोहली आणि केएल राहुलच्या अर्धशतकांमुळे भारताने ३४० रनपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ४९.१ ओव्हरमध्ये ३०४ रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताने ही मॅच ३५ रननी जिंकली.

पहिल्या वनडेमध्ये १० विकेटने पराभव झाल्यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये भारताने शानदार पुनरागमन केलं. मागच्यावर्षी भारतात झालेल्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३-२ने विजय झाला होता. सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उरलेल्या तिन्ही मॅच जिंकल्या. बंगळुरूमध्ये होणारी आजची मॅच जिंकली तर ऑस्ट्रेलिया भारतात लागोपाठ २ वनडे सीरिज जिंकेल.

Read More