Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित शर्मा वनडेचा कर्णधार, तर हा खेळाडू होऊ शकतो उप-कर्णधार!

आता वनडे संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल याची चर्चा होणार आहे

रोहित शर्मा वनडेचा कर्णधार, तर हा खेळाडू होऊ शकतो उप-कर्णधार!

मुंबई : बीसीसीआयने नुकतंच विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची भारताच्या वनडे टीमचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. रोहितला याआधीच T-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. मात्र आता वनडे संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल याची चर्चा होणार आहे. या पदासाठी टीम इंडियामध्ये असं तीन खेळाडू आहेत. 

हे तीन खेळाडू बनू शकतात उपकर्णधार

केएल राहुल 

रोहित शर्माची कर्णधारपदी निवड झाल्यानंतर केएल राहुल नवा उपकर्णधार होऊ शकतो. केएल राहुल हा देखील एक वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केलं आहे. त्याच वेळी, राहुल आधीच टी-20 संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे या संघाचा नवा उपकर्णधार होण्यासाठी राहुल हा सर्वात मोठा दावेदार आहे.

fallbacks

ऋषभ पंत 

राहुलप्रमाणेच टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋषभ पंतही टीम इंडियाचा नवा उपकर्णधार होण्याचा दावेदार असू शकतो. खरंतर पंतने भारतीय संघात खूप दिवसांपासून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. पंत देखील धोनीसारखा विकेटकीपर आहे आणि त्याला विकेटच्या मागून खेळाची चांगली समज आहे. अशा परिस्थितीत रोहितसोबत पंतची जोडी हिट ठरू शकते.

fallbacks

श्रेयस अय्यर

उपकर्णधार श्रेयस अय्यर हा संघाचा उपकर्णधार होण्याचा तिसरा सर्वात मोठा दावेदार आहे. अय्यरने चौथ्या क्रमांकावर आपले स्थान जवळपास निश्चित केलं आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने 2020 मध्ये प्रथमच आयपीएलचा अंतिम सामना खेळला. दुखापतीनंतर अय्यरने कसोटीत उत्तम पद्धतीने पुनरागमन केलं. या फॉरमॅटमधील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावलं. रोहितसह श्रेयस अय्यरकडे भारताचे उपकर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं.

fallbacks

Read More