Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मी मैत्री केली, पण त्याने मला लुटलं...; टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला भर दिवसा दणका

दीपक चहरने शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या हॉटेलच्या रूमचा आहे.

मी मैत्री केली, पण त्याने मला लुटलं...; टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला भर दिवसा दणका

Deepak Chahar gets robbed by a monkey : सध्या टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू दीपक चाहर (Deepak Chahar) संघाचा भाग नसून ब्रेकचा पूर्णपणे आनंद घेतोय. त्याच्या कुटुंबासोबत तो फिरायला गेला असून ऋषिकेशच्या (Rishikesh) वातावरणात वेळ घालवतोय. दीपकने नुकतंच त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Social Media Video) पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक माकड त्याला लुटत असल्याचं समोर आलंय. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना मात्र फार आवडला.

Deepak Chahar लुटुन पळाला माकड

दीपक चहरने शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या हॉटेलच्या रूमचा आहे. त्याच्या कुटुंबासोबत तो हॉटेलमध्ये थांबला असून त्याच्या रूमच्या बालकनीमध्ये एक माकड येतं. यावेळी चहर त्या माकडाला विचारतोय, 'अजून खाणार'? यानंतर तो माकडाला सफरचंद खाण्यासाठी देतो. 

सफरचंद दिल्यावर ते माकड रूमच्या आतच येऊन बसतं. यावेळी टेबलवर ठेवलेल्या सर्व खाण्याच्या गोष्टी चोरून पळून जातं. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर शेअर करत दीपकने कॅप्शन लिहिलंय की, मी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होतो, पण हा माझं सामान लुटून गेला. असं माझ्यासोबत नेहमी होतं.

दीपक चाहरच्या पत्नीची फसवणूक

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरची (Deepak Chahar) पत्नी जया हिची 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (एचसीए) माजी अधिकाऱ्याने जयाची फसवणूक केली होती. या घटनेनंतर दीपक चहरच्या वडिलांनी अधिकाऱ्याविरोधात नामनिर्देशन अहवाल दाखल केला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पत्नीला धमकीही देण्यात आली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात एचसीएच्या माजी अधिकाऱ्याने जया भारद्वाज (jaya bharadwaj) यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी जयासोबत हा करार केला होता.या डीलनुसार 7 ऑक्टोबर 2022 रोजी जया यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते, पण ते अद्याप परत केलेले नाहीत. इतकंच नाही तर जया यांना पैशाची मागणी करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

Read More