Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO : हिमा दासला जागतिक अॅथलेटिकस्पर्धेत सुवर्ण पदक

भारतासाठी अभिमानाची बाब 

VIDEO : हिमा दासला जागतिक अॅथलेटिकस्पर्धेत सुवर्ण पदक

मुंबई : आसामच्या 18  वर्षीय एथलीट हिमा दास हिचं नाव गुगलमध्ये सर्वात पहिलं ट्रेंड करत आहे. त्याचं कारण असं आहे की, हिमा दासने फिनलँडच्या टॅम्पेअर शहरात एक इतिहास रचला आहे. हिमाने आयएएएफ विश्व अंडर 20 अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपच्या 400 मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली असून गोल्ड मेडल मिळविला आहे. पहिल्यांदाच भारताला आयएएएफच्या ट्रॅक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे. या अगोदर भारताकडून कोणतीही महिला खेळाडू ज्युनिअर किंवा सिनिअर स्पर्धेत विश्व चॅम्पिअनशिफमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले नाही. हिमाने आपलं ही स्पर्धा 51.46 सेंकदात पूर्ण केली आहे. 

हिमा दास ही पहिली भारतीय महिला आहे जिने विश्व चॅम्पिअनशिपच्या स्तरावर स्वर्ण पदक जिंकलेल नाही. विश्व स्तरावर ट्रॅक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी भारतीय खेळाडू आहे. चौथ्या नंबरच्या लेनवरून धावणारी हिमा दास अंतिम टप्यात मात्र पहिला नंबर गाठला आहे.

सध्या हिमा दासचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More