Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Harmanpreet Kaur असो वा MS Dhoni; टीम इंडियाच्या 'या' 4 कॅप्टनने घातला अंपायर्ससोबत राडा!

Harmanpreet Kaur cricketer: हरमनप्रीत कौरच नाही तर टीम इंडियाच्या आणखी 3 कॅप्टनने राडा घातल्याचं दिसून आलं होतं. यामध्ये कॅप्टन कुल धोनीचा (MS Dhoni) देखील समावेश आहे. 

Harmanpreet Kaur असो वा MS Dhoni; टीम इंडियाच्या 'या' 4 कॅप्टनने घातला अंपायर्ससोबत राडा!

Indian Captain fight with umpires: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कोणत्याही वेळी काहीही होऊ शकतं, याची प्रचिती अनेकदा आली आहे. त्यामुळे अनेकदा वाद झाल्याचं दिसून येतं. अशातच सध्या महिला टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur cricketer) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने राडा घातला. अंपायर्सच्या (umpires) निर्णयावर आक्षेप घेत सामन्यात आणि सामना संपल्यावर देखील हुज्जत घातली. त्यामुळे आता तिच्यावर आयसीसीने (ICC) कारवाई केली आहे.

हरमनप्रीत कौरच नाही तर टीम इंडियाच्या आणखी 3 कॅप्टनने राडा घातल्याचं दिसून आलं होतं. यामध्ये कॅप्टन कुल धोनीचा (MS Dhoni) देखील समावेश आहे. तर विराट (Virat kohli) आणि गांगुलीचं (Sourav Ganguly) नाव असणारच...

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)

साल होतं 2012.. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामना खेळवला जात होता. पिच फिरकीसाठी फायद्याचं असल्याचं कळताच धोनीने रैनाला बॉलिंगला बोलवलं. धोनीने सुरेश रैनाच्या चेंडूवर मायकेल हसीच्या विरुद्ध स्टंपिंगचं अपील केलं. निर्णय थर्ड अंपायरकडे गेला. थर्ड अंपायरने प्रथम हसीला आऊट दिलं. मात्र, त्याला पुन्हा बोलवून घेण्यात आलं. चुकून नॉट आऊटऐवजी आऊटचं बटण दाबलं गेल्याचं सांगण्यात आलं होतं. तेव्हा धोनीने अंपायर्सची भरमैदानात चांगलीच खरडपट्टी काढली.

विराट कोहली (Virat kohli)

विराट कोहली अन् अॅग्रेशन यांचा प्रत्यय सर्वांनाच सामना पाहताना आला असेल. विराट कोहलीचा मैदानी ड्रामा नेहमी चर्चेत असतो. अंपायर्सच्या निर्णयावर विराट अनेकदा नापसंती दर्शवतो. मात्र, आयपीएल 2015 मध्ये श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांच्याशी कोहलीचा जोरदार वाद झाला होता. त्यावेळी विराट थेट  कुमार धर्मसेना यांच्यावर भडकल होता.  त्यावेळी खेळाडूंनी त्याला बाजूला केलं.

सौरव गांगुली (Sourav Ganguly)

सौरव गांगुलीच्या 'दादागिरी'बद्दल बोलवं तेवढं कमी. लॉर्डवर शर्ट काढून गरागरा फिरवणं असो वा भर सामन्यात शेन वॉर्नला गपगार करणं, हे फक्त दादालाच जमू शकतं. 2004 मध्ये सचिनला आऊट दिल्यानंतर गांगुलीने ज्या प्रकारे अंपायर्सला शिंगावर घेतलं. त्यानंतर मोठा राडा देखील झाला होता. त्यावेळी गांगुलीवर कारवाई करण्यात आली होती. हळुहळु गांगुलीला साईटलाईन देखील केलं जात होतं.

आणखी वाचा - Gentleman's Game ला लावला डाग? हरमनप्रीत कौरविरोधात BCCI करणार बंदीची कारवाई

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यात अंपायरने बाद दिल्यानंतर हरमनप्रीतने स्टंप्सवर बॅट आदळली अन् पंचांशी वाद घातला. सामना संपल्यानंतर देखील तिने पोस्ट मॅच प्रेझेंन्टेशनवेळी अंपायरला बोलवा, असं म्हणत टोमणा मारला. त्यानंतर आता तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्याचबरोबर तिच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे.

Read More