Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

BANW vs INDW: टीम इंडियासोबत गोलीगत धोका; कॅप्टन हरमनप्रीत कौर एवढी का भडकली? पाहा Video

Harmanpreet Kaur BANW vs INDW 3rd ODI: अंपायरने आधीच बोट उंचावल्याने हरमनप्रीत संतापली. त्यावेळी तिने बॅटने थेट स्टंप उडवले. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं समोर आलंय.

BANW vs INDW: टीम इंडियासोबत गोलीगत धोका; कॅप्टन हरमनप्रीत कौर एवढी का भडकली? पाहा Video

IND vs BAN 3rd ODI: भारत आणि बांग्लादेश (BANW vs INDW) यांच्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांग्लादेश महिला क्रिकेट संघाने सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं आहे. बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी 226 धावांचे आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर बांग्लादेशने टीम इंडियाच्या तोंडातील विजय हिसकावून घेतला आणि सिरीज बरोबरीने सोडवली आहे. भारताचा संपूर्ण संघ 3 बॉल बाकी असतानाच 225 धावात गारद झाला. त्यामुळे फक्त 1 धावाने सिरीज बरोबरीने सोडवावी लागली आहे. मात्र, या सामन्यात झालेल्या अंपायरिंगवर (umpiring) टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने आक्षेप नोंदवला आहे.

नेमकं काय म्हणाली Harmanpreet Kaur? 

मला वाटतं की या सामन्यातून बरंच काही आमच्यासाठी शिकण्यासारखं होतं. क्रिकेट सोडाच.. मात्र ज्याप्रकारे तिसऱ्या सामन्यात अंपायरिंग झालं ते आमच्यासाठी खूप धक्कादायक होतं. पुढच्यावेळी आम्ही बांग्लादेश क्रिकेट खेळण्यासाठी येऊ त्यावेळी या प्रकारच्या अंपायरिंग कसं हाताळायचं याची तयारी करून येऊ, असं म्हणत हरमनप्रीत कौरने नाराजी व्यक्त केली आहे. आजच्या सामन्यात दयनीय अंपायरिंग केलं गेलं होतं. आम्ही पंचांनी दिलेल्या काही निर्णयांबद्दल खरोखर निराश झालो आहोत, असंही हरमनप्रीत म्हणाली आहे.

बांग्लादेशने खरोखरच चांगली फलंदाजी केली, परिस्थितीनुसार फलंदाजी केली. आमच्या संघाने चांगली फाईट दिली. प्रेक्षकांनी ज्याप्रकारे आम्हाला आणि आमच्या टीमला सपोर्ट केला, हे आमच्यासाठी सप्राईजिंग होतं. दोन्ही संघांना चांगला सपोर्ट मिळाला. आमच्यासाठी ही सिरीज खुप काही शिकवणारी ठरली, असंही हरमनप्रीत म्हणाली आहे.

हरमनप्रीतने उडवले स्टंप्स

सामन्यात ज्यावेळी हरमनप्रीत बॅटिंग करत होती. त्यावेळी महिमा बॉलिंग करत होती. एका बॉलवर अंपायरने हरमनप्रीतला एलबीडब्ल्यु आऊट दिलं. खरं तर अपील कॅचसाठी करण्यात आली होती. मात्र, अंपायरने आधीच बोट उंचावल्याने हरमनप्रीत संतापली. त्यावेळी तिने बॅटने थेट स्टंप उडवले. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं समोर आलंय. त्यानंतर प्रेझेन्टेशनमध्ये बोलताना तिने नाराजी व्यक्त केली आहे.

Read More