Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs NZ: हार्दिक पांड्याने घेतला निंजा स्टाईल झेल, Video पाहून नेटकरी म्हणाले क्या बाते है!

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थकी लावत न्यूझीलंडचे सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद केले. मात्र या सामन्यात चर्चा झाली ती हार्दिक पांड्याच्या झेलची..

IND vs NZ: हार्दिक पांड्याने घेतला निंजा स्टाईल झेल, Video पाहून नेटकरी म्हणाले क्या बाते है!

India Vs New Zealand 2nd One Day Match: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थकी लावत न्यूझीलंडचे सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद केले. मोहम्मद शमीने 3, वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्याने 2 आणि मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुरने प्रत्येकी एक गडी बाद केला. मात्र या सामन्यात चर्चा झाली ती हार्दिक पांड्याच्या झेलची..हार्दिक पांड्याने गोलंदाजी करत ज्या पद्धतीने झेल घेतला, त्याचं नेटकरी कौतुक करत आहेत. न्यूझीलंडची ढासळलेली परिस्थिती पाहता संघाचं 10 वं षटक हार्दिक पांड्याला सोपवलं. या षटकात डेवोन कॉनवेला षटकातील चौथा चेंडू टाकला आणि झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. डेवोन कॉनवे 16 चेंडूत 7 धावा करून बाद झाला.

सोशल मीडियावर हार्दिक पांड्याच्या झेलचं कौतुक होत आहे. हार्दिक तळाशी असलेला कठीण झेल डाव्या हाताने पकडला. हा झेल पाहून क्रीडा समीक्षकही आवाक् झाले. यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. 

बातमी वाचा- India Vs New Zealand: भारताचं क्रॉसओव्हर सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं, हार्दिक वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडचा संघ- फिन एलन, डेवोन कॉनवे, हेन्री निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलीप्स, मायकेल ब्रासवेल, मिशे सँटनर, हेन्री शिप्ले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर  

Read More