Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Mumbai Indians ने नाही तर पांड्याने केला रोहितचा गेम? रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा!

IPL 2024 : मुंबईने (Mumbai Indians) असा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय. त्याचं कारण नेमकं काय आहे? रोहितचा (rohit sharma) गेम कुणी केला? पाहुया...

Mumbai Indians ने नाही तर पांड्याने केला रोहितचा गेम? रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा!

Hardik Pandya Captain Of MI : गेली 10 वर्ष मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) नारळ देण्यात आला आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा आगामी (IPL 2024) हंगामात कर्णधार असेल, अशी घोषणा पलटणकडून (Mumbai Indians) करण्यात आली आहे, अशातच आता हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सची कमान गेल्यानंतर एक मोठा खुलासा झालाय. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा पारा वाढल्याचं पहायला मिळतंय. 

एकीकडे मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा कायमच आमचा कर्णधार राहील, असं म्हणत मुंबई इंडियन्सने फॅन्सचा संताप कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबई इंडियन्सला लाखो फॉलोअर्सचा फटका बसलाय. मुंबईने असा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय. त्याचं कारण नेमकं काय आहे? रोहितचा गेम कुणी केला? पाहुया...

नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होणार हे आधीच ठरलं होतं. जेव्हा मुंबई इंडियन्सने ट्रेडसाठी हार्दिकशी बोलणी केली, तेव्हा हार्दिकने मुंबई इंडियन्ससमोर एक अट ठेवली होती, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. मुंबई इंडियन्समध्ये येणार असेल तर कॅप्टन्सीची जबाबदारी पण द्यावी, असं हार्दिकने सांगितल्याचं समोर आलंय. मुंबईने यासाठी वेळ घेतला अन् रोहितशी संपर्क साधला. रोहितने हार्दिकच्या कॅप्टन्सीखाली खेळण्यास मंजुरी दिल्यानंतर हार्दिक नेतृत्व करणार असल्याची घोषणा करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.

रोहित नाही तर MI नाही

रोहितला डावलल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर अनेक फॅन्सने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलंय. तर अनेकांनी सोशल मीडियावर संताप देखील व्यक्त केलाय. सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचं देखील पहायला मिळतंय. मात्र, रोहित शर्माची या सर्वावर प्रतिक्रिया कशी असेल? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Read More