Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Hardik Pandya ठरला IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत रोहित शर्माचं स्थान पाहून बसेल धक्का

IPL 2023 : IPL 2023 च्या 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव करताच हार्दिक पांड्या या लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. मात्र रोहित शर्माचा नंबर पाहिला तर तुम्हाला पण धक्का बसेल...  

Hardik Pandya ठरला IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत रोहित शर्माचं स्थान पाहून बसेल धक्का

IPL 2023, Hardik Pandya To MS Dhoni : आयपीएलच्या (IPL 2023) 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा (MI) त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर 55 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 207 धावा केल्या. तर विरुद्ध संघ मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 152 धावा केल्या.

गुजरातच्या या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) बरोबरीचे 10 गुण झाले आहेत. मुंबईला चौथ्यांदा पराभवचा सामना करावा लागला. त्याचवेळी गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर दोन सामने गमावल्यानंतर पहिला विजय नोंदवला आहे. या विजयानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने एक विक्रम स्वत: च्या नावावर केला आहे. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विजयाची टक्केवारी असलेला कर्णधार बनला आहे. (Hardik Pandya most successful captain in IPL 2023)

वाचा : गुजरातचा मोठा डाव, Mumbai Indians ला फटका; आता TOP 5 मध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागणार 'इतके' सामने 

दरम्यान आयपीएलच्या च्या 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करताच हार्दिक पांड्या (Hardik Pandya To MS Dhoni ) या लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला. सध्याच्या आयपीएल विजेत्या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने अनुभवी कर्णधार एमएस धोनीचा विक्रमही मोडला आहे. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विजयाची टक्केवारी असलेला कर्णधार बनला आहे.

हार्दिक पांड्याने 21व्यांदा गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले आणि त्याने आपल्या संघाला 16व्या विजयापर्यंत नेले. आयपीएलच्या इतिहासात त्यांनी फक्त 5 सामने हरले आहेत. अशा प्रकारे त्याची विजयाची टक्केवारी 76.1% आहे. आयपीएलमध्ये 20 किंवा त्याहून अधिक सामन्यांचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विजयाच्या टक्केवारीनुसार हार्दिक पांड्या सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तर महेंद्र सिंह धोनी आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 217 पैकी 128 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे रोहित शर्माचा समावेश पहिल्या पाच स्थानकांमध्येही नाही.

पहिल्या स्थानी हार्दिक पांड्या तर दुसऱ्या स्थानी एमएस धोनी कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी 58.99 आहे. त्याने 217 पैकी 128 सामने जिंकले आहेत. या यादीत तिसरे नाव सचिन तेंडुलकरचे आहे. ज्याने 51 सामन्यात मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले असून 30 सामने जिंकले आहेत. त्याची विजयाची टक्केवारी 58.82 आहे. स्टीव्ह स्मिथ चौथ्या, अनिल कुंबळे पाचव्या, ऋषभ पंत सहाव्या, शेन वॉर्न सातव्या, रोहित शर्मा आठव्या, गौतम गंभीर नवव्या आणि वीरेंद्र सेहवाग दहाव्या क्रमांकावर आहे.

IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार

1. हार्दिक पंड्या (76.1%)
2. एमएस धोनी (58.99%)
3. सचिन तेंडुलकर (58.82%)
4. स्टीव्ह स्मिथ (58.14%)
5. अनिल कुंबळे (57.69%)
6. ऋषभ पंत (56.67%)
7. शेन वॉर्न (56.36%)
8. रोहित शर्मा (56.08%)
9. गौतम गंभीर (55.04%)
10. वीरेंद्र सेहवाग (54.72%)  

Read More