Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Surykumar yadav : सूर्याच्या खेळीने मी निराश...! कर्णधार Hardik Pandya च्या वक्तव्याने मोठी खळबळ

सामन्याचा खरा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. शतकी खेळी करत त्याने सामन्यासह सिरीजही जिंकवून दिली. अशातच टीमचा कर्णधार हार्दिक पंड्याने  (Hardik Pandya) सूर्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

Surykumar yadav : सूर्याच्या खेळीने मी निराश...! कर्णधार Hardik Pandya च्या वक्तव्याने मोठी खळबळ

Surykumar yadav : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवली गेली. राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाने 91 रन्सने श्रीलंकेचा (INDIA win) धुव्वा उडवला आणि सिरीजवर कब्जा केला. या सामन्याचा खरा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. शतकी खेळी करत त्याने सामन्यासह सिरीजही जिंकवून दिली. अशातच टीमचा कर्णधार हार्दिक पंड्याने  (Hardik Pandya) सूर्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

सूर्यकुमारवर जळतो सूर्यकुमार यादव?

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार हार्दिक पंड्याने श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर फलंदाज सूर्यकुमारचं कौतुक केलं. यावेळी हार्दिक पंड्या म्हणाला, मला असं वाटतं की, सूर्या त्याच्या प्रत्येक खेळीने प्रत्येकाला आश्चर्यचकित करतो. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्या माध्यमातून तो आम्हाला सांगू इच्छितो की, फलंदाजी करणं किती सोपं आहे. जर मी त्याच्या समोर गोलंदाजी करत असतो, तर त्याची फलंदाजी पाहून मी निराश झालो असतो. 

सूर्याने ठोकलं शतक 

कालच्या सामन्यात केवळ 45 चेंडूत सूर्याने आपलं शतक (Suryakumar Yadav 3rd Century) पूर्ण केलं. 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत सूर्याने टी-ट्वेंटीमधील आपलं तिसरं शतक साजरं केलं. यामध्ये त्याने 8 सिक्स आणि 6 फोर खेचले. 219 च्या स्टाईक रेटने सूर्याने उत्तम खेळी केली. सूर्याच्या य़ा खेळीने टीम इंडियाचा हा स्कोर 228 पर्यंत पोहोचला होता.

सूर्याने श्रीलंकेविरूद्ध शतकी खेळी करून अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 

  • 2023 या टी -20 वर्षातलं पहिलं शतक
  • सूर्यकुमारने (surykumar yadav) 43 सामन्यात 14 अर्धशतक आणि 3 शतक ठोकले आहे.
  • सूर्यकूमारने टी20 त1500 धावा पूर्ण केल्या आहेत. 834 बॉलमध्ये त्याने या धावा पुर्ण केल्या आहेत.आतापर्यंत या सर्वात वेगवान धावा असल्याचा अंदाज आहे. 
  • सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) टी20 त तिसरे शतक ठोकले आहे. हे शतक ठोकून त्याने के एल राहूलचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
  • टी20 फॉरमॅटमध्ये तिसरे शतक

सूर्यकुमारचं टी20 फॉरमॅटमधले तीसरे टी20 शतक होते. या आधी त्याने जूलै 2022 मध्ये इग्लंडविरूद्ध 117 धावा केल्या होत्या. हे त्याचे टी20तले पहिले शतक होते. तर दुसरे शतक त्याने न्यूझीलंड विरूद्ध नोव्हेंबरमध्ये ठोकले आहेत. यावेळी त्याने 111 धावांची नाबाद खेळी केली होती. आणि आता श्रीलंकेविरूद्ध तिसरे शतक ठोकले होते. 

Read More