Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

FIFA World Cup Qualifiers : फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू, पात्रता सामन्यात भारतासमोर कुवैतचं आव्हान!

FIFA World Cup 2026 : भारताचा पहिला सामना हा आज कुवैतविरुद्ध होणार (India vs Kuwait) आहे. पात्रता फेरीत भारताच्या गटात कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ असणार आहेत. 

FIFA World Cup Qualifiers : फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू, पात्रता सामन्यात भारतासमोर कुवैतचं आव्हान!

India vs Kuwait : फुटबॉलचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कपचं (FIFA World Cup 2026) बिगुल आता वाजलं आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पात्र होण्यासाठी आता पात्रता फेरी खेळवली जात आहे. अशातच या पात्रता फेरीतील (FIFA World Cup Qualifiers) भारताचा पहिला सामना हा आज कुवैतविरुद्ध होणार (India vs Kuwait) आहे. पात्रता फेरीत भारताच्या गटात कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ असणार आहेत. त्यामुळे आता फिफाचा पात्रता सामना आणखी रोमांचक होणार असल्याचं मानलं जातंय. भारताच्या मनवीर सिंग, राहुल केपी आणि सुनील छेत्री यांच्या कामगिरीवर आता सर्वांचं लक्ष लागलंय.

कसा असेल भारताचा संघ?

फॉरवर्ड्स : इशान पंडिता, लल्लियांझुआला छांगटे, मनवीर सिंग, राहुल केपी, सुनील छेत्री

मिडफिल्डर : अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, लालेंगमाविया, लिस्टन कोलाको, महेश सिंग नौरेम, रोहित कुमार, सहल अब्दुल समद, सुरेश सिंग वांगजाम, उदांता सिंग कुमाम

डिफेंडर: आकाश मिश्रा, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, निखिल पुजारी, राहुल भेके, रोशन सिंग नौरेम, संदेश झिंगन, सुभाषीष बोस

गोलकीपर : अमरिंदर सिंग, गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ

फिफा वर्ल्डकप 2026 पात्रता फेरीसाठी (FIFA World Cup Qualifiers) एकूण 36 संघांचा समावेश आहे. प्रत्येकी 4 असे 9 गट तयार केले गेले आहेत.  हे संघ घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर राऊंड रॉबिन पद्धतीने खेळणार आहे. प्रत्येक गटात टॉप 2 वर असलेले संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. इंडिया आत्तापर्यंत कधीच पात्रता फेरीच्या तिसऱ्या टप्प्यात गेली नाही. त्यामुळे आता भारत पहिल्यांदा इतिहास रचणार का? असा सवाल आता विचारला जातोय.

भारतीय संघाच्या पात्रता फेरीचं शेड्यूल

16 नोव्हेंबर रोजी कुवैत विरुद्ध भारत असा सामना खेळवला जाईल. कुवैत सिटीच्या जबेर अल अहमदमध्ये हा सामना असणार आहे. तर दुसरा सामना हा 21 नोव्हेंबर रोजी कतार विरुद्ध भारत असा खेळवला जाईल. संध्या 7 वाजता भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियममध्ये हा सामना होईल. तर 21 मार्चला अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर अफगाणिस्ताविरुद्धच 26 मार्च रोजी गुवाहटीच्या इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियम चुरशीचा सामना होणार आहे. भारत विरुद्ध कुवैत यांच्यात दुसरी लढत ही 6 जून रोजी होईल. तर भारत विरुद्ध कतार हा सामना 11 जून रोजी होणार आहे.

Read More