Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Mayank Agarwal: चेहरा सूजला, घसा जळजळत होता...; पाणी समजून एसिड प्यायला मयंक!

Mayank Agarwal Health Update: मंगळवारी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा क्रिकेटर मयंक अग्रवालसोबत एक मोठी घटना घडली.

Mayank Agarwal: चेहरा सूजला, घसा जळजळत होता...; पाणी समजून एसिड प्यायला मयंक!

Mayank Agarwal Health Update: मंगळवारी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा क्रिकेटर मयंक अग्रवालसोबत एक मोठी घटना घडली. आगरतळ्यावरून परतत असताना त्याला बऱ्याच उलट्या झाल्या. यावेळी त्याला योग्य पद्धतीने बोलताही येत नव्हतं. तसंच त्याच्या चेहऱ्यावर देखील सूज आली होती. त्याची तब्येत इतकी बिघडली होती की, त्याला आयसीयूमध्ये भर्ती करावं लागलं. पडताळणी केल्यानंतर लक्षात आलं की, त्याने काही एसिडसारखं पेय प्यायलं होतं. 

पाणी समजून एसिड प्यायला मयंक

टीम इंडियाचा ओपनर आणि कर्नाटकचा अनुभवी फलंदाज  मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) सोमवारी रणजी ट्रॉफीचा सामना खेळून आगरतळ्यावरूत परतत होता. यावेळी एअरपोर्टवर फ्लाईटमध्ये चढताना त्याची तब्येत अचानक खालावली. त्याच्या घशाला जळजळ जाणवू लागली. यावेळी त्याला तातडीने आगरतळा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मयंकच्या जीवाला सध्या कोणताही धोका नसून त्याची प्रकृती चांगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयंकने पाणी समजून बाटलीतून ॲसिडसारखे काही पदार्थ प्यायले होते.

फ्लाईटमध्ये बऱ्याचदा झाल्या उलट्या

इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं होतं की, म्हटले आहे की, 'अगरतळाहून दिल्लीला उड्डाण करणारे इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E 5177, विमानात आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विमानाला मूळ ठिकाणी परतावं लागलं. यावेळी प्रवाशाला पुढील वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात नेण्यात आलंय. 

त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सचिव वासुदेव चक्रवर्ती यांनी मयंकच्या तब्येतीबाबत अपडेट दिलेत. त्यांच्या सांगण्यानुसारस, 'मला फोन आला की मयंक अग्रवालला आपत्कालीन स्थितीत दाखल करण्यात आलंय. मयंकने पाणी समजून बाटलीतून विषारी पेय प्यायलं, त्यानंतर त्याला सूज आली. ते ऍसिडसारखे होतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आम्ही पाहिले की त्यांचा चेहरा सुजला होता आणि त्यांना बोलता येत नव्हते.

पोलिसांची तपासणी सुरु

मयंकला आगरतळ्याहून दुपारी अडीच वाजता फ्लाइट पकडायची होती. तो फ्लाइटमध्ये चढला होता. मात्र याचवेळी त्याच्या घशात जळजळ होऊ लागली. मयंकला फ्लाइटमधून उतरवून हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात नेण्यात आलं. त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेचाही पोलीस तपास करत आहेत. 

Read More