Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या टी20 मध्ये भारताचा पराभव

सिरीजमध्ये इंग्लंडची 1-1 ने बरोबरी

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या टी20 मध्ये भारताचा पराभव

कार्डिक : दूसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडनं भारताला ५ गडी राखून नमवलं. भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी १४९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. अॅलेक्स हेल्सच्या वादळी खेळीमुळे इंग्लंडला हे लक्ष्य गाठता आलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडचा विजयाचा मार्ग सुकर झाला. या विजयासह इंग्लंडनं मालिकेत १-१ ची बरोबरी केली आहे. त्यामुळे पुढचा सामना मालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने 47 रन केले. टॉस हारल्यानंतर आधी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारताचा सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा फक्त 6 रनवर आऊट झाला. भारताचा स्कोर 15 वर असतांना भारताला दुसरा झटका बसला. शिखर धवन 10 रनवर रनआऊट झाला. सीरीजच्या पहिल्या सामन्यात शतक ठोकणारा लोकेश राहुल देखील या सामन्यात काही खास कामगिरी नाही करु शकला. 6 रनवर तो बोल्ड झाला.

सुरेश रैनाने 27 रन करत कोहलीसोबत 57 रनची पार्टनरशीप केली. रैना आऊट झाल्य़ानंतर महेंद्र सिंह धोनीने नाबाद 32 रन करत 149 रनचं आव्हान इंग्लंड समोर ठेवलं. कोहली देखील 47 रनवर आऊट झाला. हार्दिक पांड्या 12 रनवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून विले, बाल, प्लंकट आणि रशीदने एक-एक विकेट घेतली.

Read More