Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WPL 2024 Final: ई साला कप 'नामदु'; ट्रॉफीसोबत स्मृती मंधानाने जिंकली चाहत्यांची मनं

WPL 2024 Final: विजयानंतर बोलताना स्मृतीने, ई साला कप नामदु असं म्हटलंय. कन्नड माझी पहिला भाषा नाही मात्र चाहत्यांसाठी हे म्हणणं महत्त्वपूर्ण आहे, असंही स्मृतीने म्हटलं.

WPL 2024 Final: ई साला कप 'नामदु'; ट्रॉफीसोबत स्मृती मंधानाने जिंकली चाहत्यांची मनं

WPL 2024 Final: अखेर रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं स्वप्न पूर्ण झालं. तब्बल 16 वर्षांनी आरसीबीचा दुष्काळ संपला आणि महिला टीमने वुमेंस प्रिमीयर लीगची ट्रॉफी उचलली. जे काम गेल्या 16 वर्षांमध्ये पुरुषांच्या टीमला करता आलं नाही, ते काम अखेर मुलींनी केलं. चाहत्यांनी महिलांच्या टीमला देखील भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान या विजयानंतर आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना फार खूश दिसून आली. यावेळी तिने चाहत्यांसाठी देखील खास मेसेज दिला आहे. 

ई साला कप नामदु- मंधाना

विजयानंतर बोलताना स्मृतीने, ई साला कप नामदु असं म्हटलंय. कन्नड माझी पहिला भाषा नाही मात्र चाहत्यांसाठी हे म्हणणं महत्त्वपूर्ण आहे, असंही स्मृतीने म्हटलं.

गेल्या 16 वर्षांपासून आरसीबीच्या पुरुषांची टीम ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरतेय. त्यामुळे इंडियन प्रिमीयर लीग सुरु होण्यापूर्वी 'ई साला कप नामदे' असा नारा चाहत्यांकडून लगावण्यात येतो. ज्याचा अर्थ, या वर्षी कप आमचा आहे, असा होता. मात्र आता 'ई साला कप नामदे' असं स्मृतीने म्हटलं आहे, याचा अर्थ या वर्षी कप आमचा झाला आहे. 

विजेतेपदाचा सामना जिंकल्यानंतर स्मृती मंधाना खूपच उत्साहित दिसली. प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये बोलताना ती म्हणाली, "भावना अजूनही समोर आलेली नाहीये. मी माझ्या एक्सप्रेशनसोबत बाहेर पडणं माझ्यासाठी कठीण आहे. एक गोष्ट मी सांगेन की, मला या ग्रुपचा अभिमान आहे. आम्ही दिल्लीत आलो आणि दोन दणदणीत पराभवाला सामोरं जावं लागलं. आम्हाला योग्य वेळी पुढे जाण्याची गरज आहे, यावर आम्ही चर्चा केली. 

संपूर्ण टीमने ट्रॉफी जिंकली- स्मृती

स्मृती पुढे म्हणाली, "गेल्या वर्षाने आम्हाला खूप काही शिकवले. काय चूक झाली, काय बरोबर आहे, याबाबत माहिती मिळाली. मॅनेजमेंटने फक्त सांगितले की, ही तुमची टीम आहे, तुम्ही तुमचा मार्ग ठरला. ट्रॉफी जिंकणारा मी एकटी व्यक्ती नाहीये. संपूर्ण टीमने ट्रॉफी जिंकली आहे. मला काय वाटतं याबद्दल बोलणारा मी नाही. एक विधान जे नेहमी समोर येतं ते म्हणजे 'ई साला कप नामदे.' आता ते, 'ई साला कप नामदु' असं आहे. कन्नड ही माझी पहिली भाषा नाही पण चाहत्यांसाठी हे म्हणणं महत्त्वाचं होतं. 

Read More