Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ब्रावोने विराट कोहलीला म्हटलं असं काही...

वेस्टइंडीडचा आलराऊंडर ड्वेन ब्रावोने सोमवारी भारत आणि बंगलुरूचा कॅप्टन विराट कोहली याच्याबाबतीत एक महत्वाच वक्तव्य केलं.

ब्रावोने विराट कोहलीला म्हटलं असं काही...

मुंबई : वेस्टइंडीडचा आलराऊंडर ड्वेन ब्रावोने सोमवारी भारत आणि बंगलुरूचा कॅप्टन विराट कोहली याच्याबाबतीत एक महत्वाच वक्तव्य केलं.

तो असं म्हणाला की, दिग्गज क्रिस्टियानो रोनाल्डोप्रमाणे विराट कोहली असल्याचं तो म्हणाला. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत असलेला ब्रावो म्हणाला की, विराटसोबत माझे चांगले संबंध आहेत. विराट माझा लहान भाऊ डेरेनसोबत अंडर 19 मध्ये क्रिकेट खेळला आहे. आणि मी कायमच माझ्या भावाला सांगायचो की त्याने विराटच अनुकरण करायला हवं. मी हे करू शकत नाही कारण मी या संघात आहे. 

fallbacks

तसेच पुढे तो म्हणाला की, खरं तर मी विराटला आग्रह केला होता की, त्याने माझ्या भावाशी क्रिकेट संदर्भात बोलावे त्याला खास मार्गदर्शन करावे. मी कधीपण विराट कोहलीला बघतो तेव्हा मला वाटतं की, तो क्रिकेटचा क्रिस्टियानो रोनाल्डो दिसतो. आयपीएल सिझन 11 मध्ये विराट कोहलीने सगळ्यांना अपेक्षांपेक्षा सर्वाधिक खेळ केला आहे. मात्र 2016 च्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन बनवणारा कोहली अद्याप दिसलेला नाही. तीन सामन्यात कोहलीने मोठे शॉर्ट्स लावले. राजस्थान विरूद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक देखील केले. मात्र हा खेळ फार काल चालला नाही. 

विराटने साल 2016 मध्ये टूर्नामेंट 16 ओव्हरमध्ये 81.08 च्या सरासरीमध्ये 973 रन्स बनवले. आयपीएलच्या खेळाडूमध्ये सर्वाधिक स्कोर विराट कोहलीने केले आहेत. 

Read More