Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीच्या वाढदिवशी डीजे ब्रावोने बनवलं हे खास गाणं

धोनीला  ड्वेन ब्रावोकडून खास ट्रिब्युट

धोनीच्या वाढदिवशी डीजे ब्रावोने बनवलं हे खास गाणं

मुंबई : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि वेस्टइंडीजचा ऑल राउंडर ड्वेन ब्रावोने धोनीच्या वाढदिवशी एक खास गाणं बनवलं आहे. धोनी आज 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. ब्रावोने धोनीच्या वाढदिवसानिमित्त हे खास गाणं तयार केलं आहे. धोनीसाठी तयार करण्यात आलेल्या या गाण्यामध्ये त्याने धोनीचा रांची पासूनचा वर्ल्डकप जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. ब्रावोने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर हे गाणं शेअर केलं आहे.

धोनीवर तयार करण्यात आलेलं हे गाणं फॅन्सला देखील आवडलं आहे. या गाण्यावर भरपूर कमेंट देखील येत आहेत. महेंद्र सिंह धोनी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्याच्या स्वभावाने आणि कामगिरीने त्याने अनेकांचं मन जिंकलं आहे.

ड्वेन ब्रावोने धोनीला ट्रिब्यूट म्हणून तयार केलेल्या या गाण्यात त्याने हेलिकॉप्‍टर शॉट आणि त्याच्या 7 आकड्या बद्दल देखील उल्लेख केला आहे.

चेन्नई सुपर किंग्सने ऑफिशियल टि्वटर हँडलवर ब्रावोचं हे गाणं शेअर करत म्हटलं की, ''हेलिकॉप्‍टर 7 ने उड्डाण केलं आहे. ब्रावोचा थाला एमएस धोनीला ट्रिब्‍यूट। हॅप्‍पी बर्थडे एमएस धोनी.''

Read More