Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अ‍ॅथलीट दुती चंद डोपिंगच्या फेऱ्यात, तपासणीत दोषी आढळल्याने खळबळ

भारतीय स्टार अ‍ॅथलीट दुती चंद डोपिंग चाचणीत पॉझिटीव्ह आढळली आहे. यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. दुती चंदचे सँपल गेल्यावरषी 5 डिसेंबरला घेण्यात आले होते. चाचणीत तिच्या सँपलमध्ये प्रतिबंध घातलेले अनाबोलिक स्टेरॉयडची मात्रा दिसून आली आहे. 

अ‍ॅथलीट दुती चंद डोपिंगच्या फेऱ्यात, तपासणीत दोषी आढळल्याने खळबळ

Dutee Chand tests positive in doping teste: भारतीय स्टार अ‍ॅथलीट दुती चंद डोपिंग चाचणीत पॉझिटीव्ह आढळली आहे. यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. दुती चंदचे सँपल गेल्यावरषी 5 डिसेंबरला घेण्यात आले होते. चाचणीत तिच्या सँपलमध्ये प्रतिबंध घातलेले अनाबोलिक स्टेरॉयडची मात्रा दिसून आली आहे. नाडाच्या माहितीनुसार दुती चंदच्या सँपलमध्ये अँडराइन, ओस्टारिन आणि लिंगाड्रोलचं प्रमाण आढळून आलं आहे. यानंतर दुती चंदचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं आहे. 

दुतीला पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आलं आहे की, "तुम्हाला सांगण्यात येत आहे की, तुमच्या ए नमुन्यांची तपासणी नॅशनल डोप टेस्टिंग लॅबमध्ये करण्यात आली."  यावर दुती चंद हीने स्पष्टीकरण देत सांगितलं की, आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधित औषध सेवन केलेले नाही. निष्पक्ष तपासात माझे निर्दोषत्व सिद्ध होईल, अशी मला आशा आहे.

कशी होते डोपिंग टेस्ट?

कोणत्याही खेळाडूची डोप टेस्ट घेतली जाते. यासाठी खेळाडूच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने घेतले जातात. तसेच खेळाडूंसमोरच सीलबंद केले जातात. त्यानंतर प्रयोगशाळेत नियमांनुसार चाचणी केली जाते. ए चाचणीत आढळल्यास त्या खेळाडूचं तात्पुरतं निलंबल केलं जातं. त्यानंतर खेळाडून बी चाचणीसाठी दाद मागू शकतो. जर त्यातही दोषी आढळल्यास त्याला शिक्षा होते. 

26 वर्षीय दुती चंदनं 2018 आशियाई खेळात 100 मीटर आणि 200 मीटर स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. तर 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. दुसरीकडे, दुती चंद समलैंगिक असल्याने चर्चेत आली होती.

Read More