Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीची जबरदस्त स्टंपिंग, अंपायरच्या निर्णयाआधीच निघून गेला पाकिस्तानचा खेळाडू

धोनीची जबरदस्त स्टंपिंग

धोनीची जबरदस्त स्टंपिंग, अंपायरच्या निर्णयाआधीच निघून गेला पाकिस्तानचा खेळाडू

मुंबई : आशिया चषकच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारतीय टीमचा विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीने या सामन्यात पुन्हा एकदा जबरदस्त स्टंपिंग केली. धोनीच्या या स्टंपिंग नंतर पाकिस्तानचा खेळाडू स्वत:च पव्हेलियनकडे निघाला. अंपायरने भारतीय टीमने अपील केल्यानंतर थर्ड अंपायरकडे इशारा केला. पण थर्ड अंपायरचा निर्णय येण्याआधीच पाकिस्तानचा हा खेळाडू तेथून निघून गेला होता.

शादाब खानला केदार जाधवच्या बॉलवर धोनीने स्टंपिंग करत आऊट केलं. आपल्या विकेटकिपिंगसाठी जगभरात वेगळी ओळख करणारा महेंद्र सिंह धोनीने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली. शादाबने 19 बॉलमध्ये 8 रन केले.

पाकिस्‍तानचा आतापर्यंतचा आशिया कपमधला हा सर्वात मोठा पराभव होता. भारत-पाकिस्तानच्या मध्ये आता जय पराजयाचा फरक आता 6-5 असा झाला आहे. रोहित शर्मा पाकिस्तानच्या विरुद्ध पहिल्याच सामन्यात विजय मिळवणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. याआधी बिशन सिंह बेदी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि महेंद्र सिंह धोनीने ही कामगिरी केली आहे.

Read More