Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

KKR vs DC: 'होय, मी चुकलो...' अन् कॅप्टन राणाने खुलेआम जबाबदारी स्विकारली!

IPL 2023 KKR vs DC : मला वाटतं की, या कठीण खेळपट्टीवर आम्ही अजून 15 ते 20 धावा केल्या पाहिजे होत्या. होय आम्ही चुकलो, याची जबाबदारी मी घेतो, मला तिथं उभं राहायला हवं होतं, असं म्हणत नितीश राणा (Nitish Rana) निराश झाल्याचं दिसून आलं. 

KKR vs DC: 'होय, मी चुकलो...' अन् कॅप्टन राणाने खुलेआम जबाबदारी स्विकारली!

IPL 2023 KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दिलेलं टार्गेट दिल्ली कॅपिटलने (Delhi Capitals) अखेर दिल्लीने रडत रडत पूर्ण केलंय. कोलकाताने दिलेलं 128 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी दिल्लीला 20 ओव्हर खेळाव्या लागल्या. बड्या बड्या खेळाडू संघात असताना दिल्लीची निराशाजनक कामगिरी पुन्हा पहायला मिळाली. दिल्लीने यंदाच्या हंगामातील पहिला विजय नक्कीच नोंदवला आहे. मात्र, कोलकाताच्या पराभवानंतर कॅप्टन नितीश राणाचं (Nitish Rana) वक्तव्य चर्चेत आहे.

काय म्हणाला नितीश राणा?

मला वाटतं की, या कठीण खेळपट्टीवर आम्ही अजून 15 ते 20 धावा केल्या पाहिजे होत्या. होय आम्ही चुकलो, याची जबाबदारी मी घेतो, मला तिथं उभं राहायला हवं होतं, असं म्हणत नितीश राणा (Nitish Rana) निराश झाल्याचं दिसून आलं. दिल्लीच्या गोलंदाजांना पूर्ण श्रेय द्यावं वाटतं. आगामी सामने आमच्यासाठी चांगले असतील. आम्ही फक्त उशीर करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु पॉवरप्लेमध्ये ते खरोखर चांगले खेळले. तिथेच त्यांनी सामना जिंकला. 

आणखी वाचा- Live सामन्यात Virat Kohli ने केली शिवीगाळ? नेटकऱ्यांनी थेट धारेवर धरलं; पाहा Video

आम्हाला संघ म्हणून चांगलं खेळण्याची गरज आहे. आम्ही आज जशी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी प्रत्येक सामन्यात करणं आवश्यक आहे, जर आम्ही या गोष्टी सोडवल्या तर आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढू शकतो, असा विश्वास राणाने (Nitish Rana) पराभवानंतर व्यक्त केला आहे.

दरम्यान, जेसन रॉयने (Jason Roy) त्याच्या पहिल्याच सामन्यात 43 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर आंद्रे रसल वगळता आणखी कोणत्याही खेळाडूला खास फलंदाजी करता आली नाही. तर दुसरीकडे दिल्लीच्या गोलंदाजांनी सटीक गोलंदाजी करत कोलकाताला गुडघ्यावर आणलं होतं. मात्र, कोलकाताच्या गोलंदाजांनी चांगलीच फाईट दिल्याचं दिसून आलंय.

Read More