Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

फिल्डिंग राहिलं बाजूला डेव्हिड वॉर्नर मैदानात नाचला, पाहा व्हिडीओ

डेव्हिड वॉर्नरला का म्हणतायत 'मॉडर्न पुष्पा', उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ 

फिल्डिंग राहिलं बाजूला डेव्हिड वॉर्नर मैदानात नाचला, पाहा व्हिडीओ

मुंबई: डेव्हिड वॉर्न आपल्या तुफानी फलंदाजीसोबत सोशल मीडियावर मीम्स आणि रिल्ससाठीही प्रसिद्ध आहे. डेव्हिड वॉर्नर त्याच्या आवडत्या गाण्यांवर रिल्स तयार करून टाकत असतो. सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. वॉर्नरचा मैदानातला एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. 

डेव्हि़ड वॉर्नर फिल्डिंग करत असताना मैदानात डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने चक्क श्रीवल्ली गाण्यावर डान्स केला. एवढंच नाही तर पुष्पाची स्टाईल देखील स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या चाहत्यांना करून दाखवली. 

पुष्पा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक रेकॉर्ड तोडले. पुष्पाचा फिव्हर राजकारणापासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत पाहायला मिळाला. याआधी जडेजानं पुष्पाची स्टाईल मैदानात केली होती. त्यानंतर कोहलीचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

डेव्हिड वॉर्नरच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान कमेंट्स मिळत आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर एका युझरने मॉर्डन पुष्पा असंही वॉर्नरला म्हटलं आहे. 

Read More