Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सातवं सुवर्ण, टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण पदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी चौथा दिवस होता. रविवारचा हा दिवस म्हणजे भारतासाठी गोल्डन दिवस ठरला आहे. कारण, रविवारी भारताने धडाकेबाज कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे. 

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सातवं सुवर्ण, टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण पदक

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी चौथा दिवस होता. रविवारचा हा दिवस म्हणजे भारतासाठी गोल्डन दिवस ठरला आहे. कारण, रविवारी भारताने धडाकेबाज कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे.

अंतिम फेरीत सिंगापूरवर मात

भारतीय महिला टेबल टेनिस संघाने अंतिम फेरीत सिंगापूरवर मात केली आहे. या विजयासोबतच भारतीय महिला टेबल टेनिस संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

मोनिका बत्राची जबरदस्त कामगिरी

भारतीय महिलांनी केलेली ही कामगिरी म्हणजे सुवर्ण कामगिरी ठरली आहे. मोनिका बत्राने अंतिम फेरीत चांगला खेळ दाखवत सुवर्णपदक निश्चीत केलं.

भारताला एकूण सात सुवर्ण

भारताच्या महिला टेबल टेनिस संघाने मिळवून दिलेल्या या सुवर्ण पदाकामुळे भारताच्या खात्यात एकूण सात पदकं आली आहेत.

भारताची सुवर्ण कामगिरी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत ७ सुवर्ण पदकं, ३ ब्रॉन्झ पदक, २ सिल्वर पदक मिळाले आहेत.

Read More