Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Pushpa : सर जाडेजा अल्लू अर्जूनच्या Pushpa च्या प्रेमात, शेअर केला खास फोटो

मैदानावर ऑलराऊंड कामगिरी करणारा जडेजा मैदानाबाहेरही तितकाच चर्चेत असतो

Pushpa : सर जाडेजा अल्लू अर्जूनच्या Pushpa च्या प्रेमात, शेअर केला खास फोटो

Pushpa Fan Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखापतीचा सामना करत आहे. सध्या त्याच्यावर बंगळुरू इथल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू आहेत. जडेजाची दुखापत बरी होण्यासाठी काही महिने लागू शकतात अशी माहिती आहे. 

अष्टपैलू रवींद्र जडेजा सध्या भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. मात्र, मैदानाबाहेरही तो खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याची अभिनय प्रतिभा. जडेजा सध्या तेलुगु चित्रपट 'पुष्पा'च्या (Pushpa: The Rise) प्रेमात आहे.

अल्लू अर्जुनचा बनला फॅन
नुकतंच त्याने 'पुष्पा' चित्रपटातील एक संवाद कॉपी करून सोशल मीडियावर शेअर केला होता. आता त्याने या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) लूक कॉपी केला आहे. जडेजाने 'पुष्पा' चित्रपटातील हिरो म्हणजेच अल्लू अर्जुनच्या लूकची हुबेहुब कॉपी (Pushpa Look) केली आहे आणि यात तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाला आहे.

चाहत्यांकडून जडेजाचं कौतुक 
सोशल मीडियावरही चाहते जडेजाच्या या लूकचं खूप कौतुक करत आहेत. रवींद्र जडेजाने हा फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये तो अल्लू अर्जुनप्रमाणेच बिडी ओढताना दिसत आहे. मात्र, आपल्या फोटोबरोबर जडेजाने कॅप्शनमध्ये चाहत्यांना धुम्रपान न करण्याचं आवाहन केलं आहे.

जडेजाने कॅप्शनमध्ये काय लिहिलंय?
जडेजाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय 'कोणत्याही प्रकारचं तंबाखू सेवन करणं हानिकारक आहे. मी कोणत्याही प्रकारच्या धूम्रपानाचं समर्थन करत नाही. हे सर्व मी फक्त फोटोंच्या निमित्ताने केलं आहे. सिगारेट, विडी आणि तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामुळे कर्करोग होतो आणि त्याचं सेवन करू नका.

व्हिडिओ केला होता शेअर
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. खुद्द ऑलराऊंडर रवींद्र जडेजाही या चित्रपटाच्या प्रेमात आहे. फोटोआधी त्याने चित्रपटाचा हिट डायलॉग बोलताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

Read More