Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धक्कादायक! क्रिकेटर मयंक अग्रवाल ICU मध्ये दाखल, विमानात चढताना नेमकं काय झालं?

Mayank Agarwal In ICU : टीम इंडियाचा सलामीवीर मयंक अग्रवाल याला तातडीने रुग्णालयात दाखल (Mayank Agarwal Admitted to hospital) करण्यात आलं आहे. तो सध्या आयसीयूमध्ये असल्याची माहिती मिळतीये.

धक्कादायक! क्रिकेटर मयंक अग्रवाल ICU मध्ये दाखल, विमानात चढताना नेमकं काय झालं?

Mayank Agarwal admitted to hospital :  भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याला अचानक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. टीम इंडियातून बाहेर असलेल्या मयंक अग्रवाल सध्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामने खेळतोय. एका सामन्यानंतर फ्लाइटमध्ये चढताना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात (Admitted to hospital) दाखल करण्यात आलंय. रणजी ट्रॉफी सामन्यानंतर ते त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून परतण्यासाठी विमानात चढत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली, अशी माहिती समोर आली आहे.

सध्या रणजी स्पर्धेत खेळत असलेल्या मयंक अग्रवाल हा कर्नाटक संघाचं नेतृत्व करतोय. कर्नाटकने आगरतळा येथील महाराज बीर बिक्रम स्टेडियमवर त्रिपुरावर 29 धावांनी विजय मिळवला. आता कर्नाटकचा आगामी सामना सुरतच्या लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर रेल्वेविरुद्ध होणार आहे. यासाठी मयंक विमानाने सुरतला जाणार होता. मात्र, विमानात चढत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

मयंकच्या तोंडात आणि घशात अस्वस्थता जाणवत असल्याच्या तक्रारीनंतर त्याला तात्काळ विमानातून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या चिंतेचे कारण नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये.

मयंकला सध्या आराम करण्याचा सल्ला दिला गेला असून तो निरीक्षणाखाली आहे. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी रुग्णालयात आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये तो सौराष्ट्रविरुद्धचा पुढील सामना खेळणार नाही. उर्वरित संघ आज रात्री राजकोटला पोहोचेल, अशी माहिती मॅनेजमेंटकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मयंक अग्रवाल सध्याच्या रणजी ट्रॉफी हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 4 सामन्यात 44.28 च्या सरासरीने 460 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतकांचाही समावेश आहे. 2022-23 रणजी हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही अग्रवालच्या नावावर आहे.

Read More