Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार

Indian Cricket Team Squad: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. 16 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. 

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार

Indian Team Squad: येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup) ला सुरुवात होईल. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या (Team India) मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरवात होणार आहे. यादरम्यान भारतीय नियामक मंडळाने भारताच्या महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket Team) घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेदरम्यान कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. येत्या 16 जूनपासून या मालिकेची सुरुवात होणार असून 13 जूनला एकिदवसीय सराव सामना खेळवला जाणार आहे. 

भारत वि. द. आफ्रीका मालिका
भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेची सुरुवात एकदिवसीय सामन्यापासून होणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका असून 16 जून ते 23 जूनदरम्यान ही मालिका खेळवली जाईल. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान एकमेव कसोटी सामना  28 जून ते 1 जुलैदरम्यान रंगणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका होईल. टी20 मालिका 5 ते 9 जुलैदरम्यान रंगणार आहे.  

या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ भारतात येणार असून एकदिवसीय मालिका बंगळुरुला तर कसोटी आणि टी20 मालिका चेन्नईत खेळवली जाणार आहे. 

हरमनप्रीतकडे टीम इंडियाचं नेतृत्वा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीनही मालिकांसाठी टीम इंडियाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलं आहे. तर तीनही मालिकांसाठी स्मृती मंधाना टीम इंडियाची उपकर्णधार असेल. तीन मालिकांमध्ये जेमिमा रोड्रिग्स आणि पूजा वस्त्रकार यांचा समावेश करण्यात आला आहे. 

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताचा एकदिवसीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमिमा रोड्रिग्स , ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), दयालन हेमलता, राधा यादव,आशा सोभना, श्रेयंका पाटिल, सायका इशाक, पूजा वस्त्राकर , रेणुका सिंह ठाकुर, अरुंधति रेड्डी, प्रिया पुनिया. 

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताचा कसोटी महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमा रोड्रिग्स , ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, स्नेह राणा, सैका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, मेघना सिंह, प्रिया पुनिया. 

दक्षिण अफ्रीकाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (विकेटकीपर), ऋचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्स ,सजना सजीवन, दीप्ति शर्मा, श्रेयंका पाटिल, राधा यादव, अमनजोत कौर, आशा सोभना, पूजा वस्त्रकार , रेणुका सिंह ठाकुर, अरुंधति रेड्डी.

राखीव खेळाडू- साइका इशाक

Read More