Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Cricket : रोहित-विराटलाही जमलं नाही, टी20 क्रिकेटमध्ये हरमनप्रीतच्या नावावर मोठा विक्रम

India Women Cricket : महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना होता तो आयर्लंडशी, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत खेळण्यासाठी मैदानात उतरली आणि तिच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला

Cricket : रोहित-विराटलाही जमलं नाही, टी20 क्रिकेटमध्ये हरमनप्रीतच्या नावावर मोठा विक्रम

Harmanpreet Kaur 150th T20I: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) महिला टी20 वर्ल्ड कप (Women T20 World Cup) खेळवला जात आहे. हरमनप्रती कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ (Women Cricket Team) या स्पर्धेत उतरला आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची (Team India) चौथ्या सामन्यात गाठ पडली ती आयर्लंड (Ireland) संघाशी. या सामन्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) मैदानावर उतरताच तिच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला. आतापर्यंत असा विक्रम विराट कोहली (Virat Kohli) किंवा रोहित शर्मालाही (Rohit Sharma) करता आलेला नाही.

हरमनप्रीतच्या नावावर मोठा विक्रम
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात हरमनप्रीत कौर पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. 150 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम (T20 Internation Record) तिच्या नावावर जमा झाला आहे. पुरुष भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही तिने मागे टाकलं आहे. रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत 148 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची नोंद आहे. आता सर्वाधिक टी20 सामने खेळण्याचा मान हरमनप्रीतच्या नावावर जमा झाला आहे. हरमनप्रीतने 11 जून 2009 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

हरमनप्रीतची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
हरमनप्रीतने आतापर्यंत भारतासाटी 3 कसोटी सामने, 124 एकदिवसीय आणि 150 टी20 सामने खेळले आहेत. 3 कसोटीच्या पाच इनिंगमध्ये तीने 38 धावा केल्या आहेत. तर 124 एकदिवसीय सामन्यात तीने 38.18 च्या अॅव्हरेजने 3322 धावा केल्यात आहेत. यात 5 शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात तिचा सर्वाधिक स्कोर आहे 171 धावांचा.

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तीने 27.97 च्या अॅव्हरेजने 2993 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. तिचा हायेस्ट स्कोर आहे 103. 

Read More