Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Team India: टीम इंडियाला मोठा धक्का, मैदानातच कर्णधाराला गंभीर दुखापत

Indian Cricket: भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधाराला सामना सुरु असतानाच गंभीर दुखापत झाली. दुखापतीमुळे कर्णधाराला मैदान सोडून पॅव्हेलिअनमध्ये जावं लागलं. 

Team India: टीम इंडियाला मोठा धक्का, मैदानातच कर्णधाराला गंभीर दुखापत

INDW vs BANW 2nd ODI: भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली सध्या वेस्ट इंडिजच्या (West Indies Tour) दौऱ्यावर आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला कसोटी सामना जिंकत भारताने 1-0 (Team India) अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना उद्या क्विन्स पार्कला खेळवला जाणार आहे. दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघ हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली बांगलादेशच्या दौऱ्यावर (Bangladesh) आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जातेय. मालिकेतला दुसरा सामना ढाकात खेळवला जातोय. या सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

कर्णधार गंभीर जखमी
भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 228 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्सने अर्धशतकी खेळी केली. पण सामन्याच्या 28व्या ओव्हरदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला. या षटकात हरमनप्रीतची बॅट मैदानात अडकली आणि त्यामुळे तिचा तोल गेला आणि मैदानावर कोसळली. त्यानंतर 35 व्या षटकात वेगाने येणार एक चेंडू तिच्या ग्लोव्ह्सवर आदळला. त्यानंतर ती रिटायर्ज हर्ट झाली. 

दुखापतीनंतरही फलंदाजीला आली
दुखापतीनंतर हरमनप्रीतने मैदान सोडलं. पण दुखापत झाल्यानंतरही हरमनप्रीत पुन्हा मैदानावर आली. मैदानावर येताच तीने आपलं अर्धशतक पूर्ण  केलं. हरमनप्रीतने 88  चेंडूत 3 चौकार मारत 52 धावा केल्या. 

भारताला विजय गरजेचा
तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे सीरिज वाचवण्यासाठी भारतीय महिला संघाला या सामन्यात कोणत्याही परिस्थिती विजय मिळवावाच लागणार आहे. बांगलादेशची कर्णधार निगार सुल्तानाने टस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताततर्ऱे कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रीग्सने दमदार फलंदाजी केली. दोघींनी अर्धशतकी खेळी केली. या जोरावर भारताने 8 विकेट गमावत 228 धावा केल्या. 

एशिया कपचं वेळापत्रक
दरम्यान, एशिया कप 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेचं वेळपत्रक आज पाकिस्तान क्रिकेट मंडळ (PCB) जाहीर करणार आहे. पाकिस्तान आणि भारतादरम्यान ठिकाणावरुन वाद सुरु होता. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर आता एशिया कप स्पर्धेचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धेचं वेळपत्रक जाहीर करण्यास उशीर झाला होता. 

Read More