Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WI vs ENG: आयपीएल ऑक्शनआधी 'या' खेळाडूने ठोकल्या 442.86 च्या स्टाईक रेटने धावा, लिलावात खोऱ्याने पैसे ओढणार

WI vs ENG 3rd T20: सनरायझर्स हैदराबादने गेल्या लिलावात 13.25 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन ब्रूकला (Harry Brook) आपल्या संघात सामील करून घेतलं होतं. या मोसमात तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा फलंदाज ठरला होता.

WI vs ENG: आयपीएल ऑक्शनआधी 'या' खेळाडूने ठोकल्या 442.86 च्या स्टाईक रेटने धावा, लिलावात खोऱ्याने पैसे ओढणार

WI vs ENG 3rd T20, Harry Brook : आयपीएल लिलावाआधी (IPL 2024 Auction) प्रत्येक खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. फँचायझीला आपली क्षमता दाखवून देऊन मोठी बोली मिळवायचा प्रयत्न खेळाडूंचा असतो. अशातच आता यंदाच्या लिलावात कोणता खेळाडू बाजी मारणार? यावर सर्वांच लक्ष लागलं आहे. अशातच आता हैदराबादच्या एका खेळाडूवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. त्याला कारण या खेळाडूने 100 किंवा 200 नाही तर थेट 442.86 च्या स्टाईक रेटने धावा कुटल्या आहे. 

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (West Indies vs England) यांच्यात तिसरा टी-ट्वेंटी सामना खेळवला गेला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 222 धावांची मोठी धावसंख्या उभारली. 223 धावांचा पाठलाग करणं इंग्लंडसाठी मोठं आव्हान होतं. मात्र, सलामीवीर फिल सॉल्टने 56 चेंडूत 109 धावांची आक्रमक खेळी केली. यानंतर हॅरी ब्रूकने (Harry Brook ) अवघ्या 7 चेंडूत 31 धावा केल्या आणि इंग्लंडने हा सामना 7 विकेटने जिंकला. या दोन्ही खेळाडूंच्या भन्नाट खेळीमुळे यांच्यावर लिलावात मोठा डाव लावला जाऊ शकतो.

सनरायझर्स हैदराबादने गेल्या लिलावात 13.25 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन ब्रूकला आपल्या संघात सामील करून घेतलं होतं. या मोसमात तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा फलंदाज ठरला होता. मात्र, एक शतक वगळता त्याला मागील हंगामात मोठी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे हैदराबादने आपला खिशा ढिल्ला केलाय. यंदाच्या हंगामात ब्रुकची मूळ किंमत दोन कोटी आहे. तर फिल सॉल्टची मूळ किंमत दीड कोटी रुपये आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर मोठी बोली लागेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सनरायझर्स हैदराबाद

कायम ठेवलेले खेळाडू : अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंह, शाहबा सिंह, टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्रसिंग यादव, वॉशिंग्टन सुंदर.

सोडलेले खेळाडू : आदिल रशीद, अकेल होसेन, हॅरी ब्रूक, कार्तिक त्यागी, समर्थ व्यास, विव्रत शर्मा.

Read More