Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs BAN: टीम इंडिया या 3 खिळाडूंच्या जोरावर जिंकणार पहिला कसोटी सामना, चौथ्या दिवशीच खेळ संपणार!

India vs Bangladesh: बांग्लादेश विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयापासून 10 विकेट दूर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी संघाचे 3 गोलंदाज बांग्लादेशच्या फलंदाजांवर मात करु शकतात. 

IND vs BAN: टीम इंडिया या 3 खिळाडूंच्या जोरावर जिंकणार पहिला कसोटी सामना, चौथ्या दिवशीच खेळ संपणार!

IND vs BAN 1st Test Match: भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आहे. ( Cricket News in Marathi ) टीम इंडिया हा सामना सहज तीन खेळाडूंच्या जोरावर जिंकण्याची शक्यता अधिक आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs BAN) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन विकेट्सवर 258 धावा करुन आपला दुसरा डाव घोषित केला आणि बांग्लादेशसमोर 513 धावांचे अत्यंत मोठे आव्हान ठेवले आहे. खेळाच्या चौथ्या दिवशी सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या गोलंदाजांवर असणार आहेत.

पहिल्या डावात सर्वाधिक यशस्वी ठरला हा गोलंदाज 

या कसोटीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 404 धावा ठोकल्या. याला प्रत्युत्तर देताना बांग्लादेशी फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. गोलंदाज कुलदीप यादव  (Kuldeep Yadav) हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. पहिल्या डावात 16 षटके टाकताना त्याने 40 धावा देऊन 5 बळी घेतले. 22 महिन्यांनंतर कसोटी संघात पुनरागमन करताना त्याने हा धमाका केला आहे. 

सर्वांच्या नजरा या वेगवान गोलंदाजावर  

बांग्लादेशचा संघ चौथ्या दिवसाचा खेळ 42 धावांनी पुढे सुरू करेल. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांच्या नजरा सुरुवातीच्या तासात युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर असतील. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात घातक गोलंदाजी करताना बांग्लादेशच्या फलंदाजांना खूप त्रास दिला होता. पहिल्या डावात 13 षटकात गोलंदाजी करताना त्याने केवळ 20 धावा दिल्या आणि 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. 

हा खेळाडू सर्वाधिक अनुभवी

या सामन्यात टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) हा भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. पहिल्या डावात त्याला एकही बळी घेता आला नाही. पण जहूर अहमद चौधरी स्टेडियमच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी आर अश्विन  (Ravichandran Ashwin) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरू शकतो. रविचंद्रन अश्विनच्या नावावर कसोटीत एकूण 442 विकेट आहेत. त्याचा हा अनुभव भारतीय संघासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. 

Read More