Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहास पहिल्यांदा असं घडलं, एकाच षटकात 43 धावा... विश्वास नसेल तर Video पाहा

Cricket Video : क्रिकेट खेळात विक्रम मोडणं आणि नवे विक्रम रचले जाणं हे घडत असतं. पण क्रिकेटच्या इतिहासात असा एक विक्रम रचला गेलाय जो यापूर्वी कधी घडला नव्हता आणि पुढे घडला जाईल याची शाश्वती नाही.

क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहास पहिल्यांदा असं घडलं, एकाच षटकात 43 धावा... विश्वास नसेल तर Video पाहा

Cricket Video : क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे जुने विक्रम मोडले जातात आणि नवे विक्रम रचले जातात. पण आताअसा एक विक्रम (Record) रचला गेलाय जो क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहासात कधीच घडला नव्हता. एका षटकात सहा चेंडुवर सहा षटकार मारत फार तर 36 धावा होऊ शकतात. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज युवराज सिंगने टी20 वर्ल्ड कपमध्ये हा विक्रम केलाय. पण तुम्ही कधी विचार केलाय का एका षटकात 43 धावा होऊ शकतात. पण प्रत्यक्षात क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम नोंदवला गेला आहे. 

एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम
क्रिकेटमध्ये असे काही विक्रम असतात जे थक्क करणारे असतात. असाच एक रेकॉर्ड इंग्लंडमध्ये (England) रचला गेला आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये न भूतो न भविष्यतो विक्रम पाहायला मिळाला. होवच्या काऊंटी ग्राऊंडवर लेस्टरशायरच्या (Leicestershire) फलंदाजाने गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली.

गोलंदाजांची धुलाई
क्रिकेट जगतात नवख्या असणाऱ्या एका फलंदाजाने इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज ओली रॉबिन्सनची (Ollie Robinson) अक्षरश: पिसं काढली. काऊंट क्रिकेटमध्ये ससेक्स (Sussex) आणि लेस्टरशायरदरम्यान सामना खेळवण्यात आला. ससेक्सने पहिली फलंदाजी करताना 442 धावा केल्या. तर लेस्टरशायरने 275 धावा केल्या. दुसऱ्या डावात ससेक्सने 6 विकेट गमावत 296 धावा करत डाव घोषित केला. लेस्टरशायरसमोर विजयासाठी 464 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. 

लुईस किम्बरची तुफान फटकेबाजी
पहिल्या डावात लेस्टरशायरची 175 धावांवर 7 विकेट अशी अवस्था होती. पण त्याचवेळी मैदानावर लेस्टरशायरचा फलंदाज लुईस किम्बर (Louis Kimber) आला आणि त्याने वातावरणच बदलवलं. अवघ्या 62 चेंडूत किम्बरने शतक ठोकलं. आपल्या खेळीत किम्बरने तब्बल 18 चौके आणि 16 चौकारांची बरसात केली. 

रॉबिन्सनच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
27 वर्षांच्या लुईस किम्बरने इंग्लंडसाठी 20 कसोटी खेळलेल्या ससेक्सचा प्रमुख गोलंदाज ओली रॉबिन्सनच्या एकाच षटकात तब्बल 43 धावा केल्या. काऊंट क्रिकेट चॅम्पियनशिपच्या 134 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाने एका षटकात इतक्या धावा दिल्या नव्हत्या. रॉबिन्सनच्या नावावर यामुळे लाजीरवाणा विक्रम जमा झाला आहे.  किम्बरने एका षटकात सहा चौके आणि 2 षटकार मारत 37 धावा केल्या. यात धावून 1 धाव केली. रॉबिन्सने तीन नो बॉल टाकले. काऊंटी क्रिकेटमध्ये नो बॉलवर दोन धावांची पेनाल्टी आहे. 

Read More