Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पुन्हा मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने...'या' दिवशी रंगणार सामना

Ind vs Paki clash in Lahore : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानवर 6 धवांनी मात केली. त्यानंतर आता क्रिकेट प्रेमींसाठी आणखी एक खुशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. 

पुन्हा मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा  येणार आमने-सामने...'या' दिवशी रंगणार सामना

India vs Pakistan clash in Lahore : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानचा (Ind vs Pak) पराभव केला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडिअमवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत भारताने पाकिस्तानचा सहा धावाने पराभव केला. या सामन्याची नशा अजून उतरली नाही तोच क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा मौका मौका करण्याची संधी मिळणार आहे. 

भारत-पाक पुन्हा आमने सामने
भारत आणि पाकिस्तानचा संघ चॅम्पियन ट्रॉफीत (Champions Trophy 2025) आमने सामने येणार आहेत. यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हा सामना लाहोरमध्ये खेळवण्याची शक्यता आहे. पण असं असलं तरी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये जाणार की नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.

भारताचं पारडं जड
आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताचं पारडं नेहमीच जड राहिलं आहे. वन जे वर्ल्ड कप आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाला केवळ एक विजय मिळवता आला आहे. तर भारताच्या खात्यात पाकिस्तानविरुद्ध तब्बल 15 विजयांची नोंद आहे. पण याला अपवाद आहे आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीची. या स्पर्धेत पाकिस्तानने भारताला चांगली टक्कर दिली आहे. आता चॅम्पियन ट्ऱॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. 

चॅम्पियन्स ट्ऱॉफीचं वेळपत्रक तयार
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमवर खेळण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक आयसीसीकडे सोपवलं आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आठ संघ सहभागी होणार असून लीग राऊंडमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होऊ शकतो.

भारत सकार घेणार निर्णय
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. पीसीबीकडून या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार का याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. भारत सरकार याबाबतचा निर्णय घेणार आहे. भारत सरकारकडून परवानगी न मिळाल्यास आशिया कपसारखं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रिड मॉडेल तयार करावं लागेल. म्हणजे भारत-पाक सामना त्रयस्थ ठिकाणी आयोजित करावा लागेल. 

पाकिस्तानात होणार स्पर्धा
पाकिस्तानात होणारी चॅम्पियन ट्रॉफी 20 दिवस चालणार आहे. या स्पर्धेतील सामना लाहोर, कराची आणि रावळपिंडीत खेळवले जाणार आहेत. भारताचे सामने लाहोरमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. लाहोरमध्ये सर्वाधिक 7 सामने खेळवले जातील. तर रावळपिंडीत 5 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. कराचीत 3 सामने होतील. सेमीफायनलचा एक सामना कराचीत तर दुसरा सामना रावळपिंडीत खेळवला जाईल. तर अंतिम सामना 9 मार्चला लाहोरमध्ये रंगेल.

Read More