Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

नवीन उल हकच्या भांडणानंतर विराट कोहलीला एक मेसेज आला होता? दिग्गज खेळाडूचा दावा

IPL Virat Kohli vs Nnaveen ul Haq : आयपीएल 2023 चा हंगाम वादामुळे प्रचंड गाजला. यापैकी सर्वात जास्त वाद गाजला तो विराट कोहली आणि नवीन उल हकदरम्यानच्या भांडणामुळे. या वादानंतर एका खेळाडूने विराट कोहलीला इन्स्टाग्रामवर एक मेसेज पाठवल्याचा दावा पाकिस्तानी खेळा़डूने केला आहे. 

नवीन उल हकच्या भांडणानंतर विराट कोहलीला एक मेसेज आला होता? दिग्गज खेळाडूचा दावा

IPL Virat Kohli vs Nnaveen ul Haq : आयपीएल 2023 (IPL) मध्ये 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान (RCB) खेळला गेलेला सामना जबरदस्त वादग्रस्त ठरला. या सामन्यात RCB ने 18 धावांनी विजय मिळवला. पण विजयापेक्षा या सामन्यात चर्चा झाली ती आरसीबीच्या विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊच्या नवीन उल हक (Naveen Ul Haq) दरम्यान झालेल्या भांडणाची. हे कमी की काय विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्येही या सामन्यात वादाची ठिणगी उडाली. 

विराट कोहलीला मेसेज
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्या भांडणानंतर विराट कोहलीला एक मेसेज आल्याचा दावा पाकिस्तानी खेळाडूने केला आहे. या भांडणानंतर बीसीसीआयने कोहली आणि गंभीरच्या मॅच फिमधून 100 टक्के रक्म दंड म्हणून आकारला होता. तर नवीन उल हकच्या मॅचमधून 50 टक्के रक्कम कापून घेतली. पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हकने केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या सलमान आगाने विराट कोहलीला एक इन्स्टाग्राम मेसेज पाठवला होता. इमाम उल हकने एका मुलाखतीत हा दावा केला आहे. यात त्याने म्हटलंय विराट कोहली आणि नवीन उल हकदरम्यानचं भांडण मला चांगलं आठवतंय. विराट कोहली चांगलाच संतापल होता. यानंतर सलमान आगाने विराटला मेसेज केला.  यात त्याने म्हटलं होतं, 'विराट कोहली शांत हो'  पाकिस्ताी खेळाडूने मेसेज पाठवल्याने हा चर्चेचा विषय बनलाय. 

विराट-शादाब मित्र
इमाम उल हकने आपल्या मुलाखतीत विराट कोहली आणि शादाब खान चांगले मित्र असल्याचंही म्हटलं आहे. विराट कोहलीचा स्वभाव विनोदी आहे. गेल्याा दोन वर्षात भारत आणि पाकिस्तानदरम्यान भरपूर सामने झाले. हेच कारण असावं की विराट आणि शादाबची चांगली मैत्री झाली.

विराट-नवीनचं भांडण मिटलं
दरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हकदरम्याचं भांडणं पूर्णपण मिंटलं आहे. दोघंही आता जांगले मित्र बनलेत. विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात दोघांमध्ये मैत्री झाली. या सामन्यात प्रेक्षक नविन उल हकला डिवच होते, पण विराटने असं न करण्याची विनंती प्रेक्षकांना केली. त्यानंतर विराटने भर मैदानात नविनची गळाभेटही घेतली. सामन्यातनंतर विराट आणि नविनने चांगल्या गप्पा मारल्या. 

विराट कोहली आणि नवीन उल हकच्य मैत्रीवर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली होती. खेळाडूंमधलं भांडण हे केवळ मैदानावरच असतं. दोघांनीीह मैदानावर असताना आपलं कर्तव बजावलं. मैदानात खेळाडूंना चिडवताना प्रेक्षकांनी भान बाळगावं असं आवाहनही गौतम गंभीरने केलंय. 

Read More