Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ग्लेन मॅक्सवेलची अचानक प्रकृती खालावली, काल रात्री नेमकं काय झालं? ऑस्ट्रेलिया क्रिकेट करणार चौकशी!

Glenn Maxwell hospitalised : ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅटर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. मॅक्सवेलला कोणतीही दुखापत किंवा आजार नाही. मात्र, एका वेगळ्याच कारणामुळे त्याला रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला.

ग्लेन मॅक्सवेलची अचानक प्रकृती खालावली, काल रात्री नेमकं काय झालं? ऑस्ट्रेलिया क्रिकेट करणार चौकशी!

Cricket Austrelia On Glenn Maxwell : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेपूर्वी (AUS vs WI) ऑस्ट्रेलियाला संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला अचानक रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. मॅक्सवेलला कोणताही आजार किंवा दुखापत नसून, पबमध्ये पार्टीदरम्यान मॅक्सवेलने मद्यपान केल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅक्सवेलची प्रकृती अचानक बिघडली होती. अॅडलेडमधील एका पबमध्ये झालेल्या पार्टीनंतर ही घटना घडली.

झालं असं की, मॅक्सवेल अँडलेडमधील एका प्रसिद्ध गोल्फ स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने गोल्फ खेळत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यानंतर तो पबमध्ये पोहोचला. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीचा बँड सिक्स अँड आऊटही इथं आला होता. ब्रेट ली याच पबमध्ये परफॉर्म करत होता. मात्र, त्यानंतर जोरदार पार्टीनंतर मॅक्सवेलची तब्येत खालावल्याचं दिसून आलं.  त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

दरम्यान, या प्रकरणाबाबत अद्याप संपूर्ण माहिती समोर आली नाही. मॅक्सवेलला रुग्णालयातून लगेच सोडलं होतं, असंही ऑस्ट्रेलियन मीडियाने सांगितलंय. तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता या प्रकरणात लक्ष घातलं असून याची चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका होणार आहे, ज्यामुळे मॅक्सवेलला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. अशातच आता ही धक्कादायक माहिती समोर आलीये.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ:

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, अॅरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, जेक फ्रेझर, लान्स मॉरिस, मॅट शॉर्ट आणि अॅडम झाम्पा.

Read More