Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमने-सामने, एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. एशिया स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे 15 दिवसातच तब्बल तीन वेळा भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. 

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमने-सामने, एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup 2023 Schedule : भारतात या वर्षाच्या अखेरीत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (ODI World Cup 2023) खेळवली जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानात (Pakistan) एशिया कप स्पर्धा रंगणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्या सामन्याच्या ठिकाणावरुन वाद सुरु होता. बीसीसीआयने टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानाने हायब्रिड मॉडलची (Highbreed Model) ऑफर केली. त्यानुसार आशिया कप स्पर्धेतले 4 सामने पाकिस्तानात तर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल. श्रीलंका आशिया कप स्पर्धेची गतविजेता संघ आहे. 

'या' तारखांना आमने सामने
एशियन क्रिकेट काऊन्सीलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यजमान पाकिस्तान आणि नेपाळदरम्यान स्पर्धेतला सलामीचा सामना खेळवण्यात येईल. पाकिस्तानमधल्या मुलतानमध्ये हा सामना रंगेल. तर भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan) 2 सप्टेंबरला पहिला सामना खेळवला जाईल. हा सामना श्रीलंकेतल्या कँडीमध्ये खेळवलाज जाईल. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. यात भारत आणि पाकिस्तानशिवाय श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. प्रत्येकी 3 संघ दोन ग्रुपमध्ये विभागाण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. 

दोनी ग्रुपमधील टॉपचे चार संघ सुपर-4 मध्ये पोहोचतली. सुपर-4 (Super-4) मध्ये टीम इंडियाचा 10 सप्टेंबरला बाबर आझमच्या पाकिस्ताशी सामना होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवली जातील. भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचेल, तर 17 सप्टेंबरला हे दोन्ही संघ आमने सामने येतील. म्हणजेच 15 दिवसात भारत-पाक तीन वेळा भिडतील.

एशिया कप 2023 संपूर्ण वेळापत्रक
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका- 31 ऑगस्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान- 2 सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान- 3 सप्टेंबर
भारत विरुद्ध नेपाल- 4 सितंबर
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर

सुपर-4 चे सामने
ए1 विरुद्ध बी2- 6 सप्टेंबर
बी1 विरुद्ध बी2- 9 सप्टेंबर
ए1 विरुद्ध ए2- 10 सप्टेंबर
ए2 विरुद्ध बी1- 12 सप्टेंबर
ए1 विरुद्ध बी1- 14 सप्टेंबर
ए2 विरुद्ध बी2- 15 सप्टेंबर
अंतिम सामना -  17 सप्टेंबर

Read More