Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

क्रिस गेलचं शतक, टी-२०मध्ये सर्वाधिक स्कोअर, सिक्सचा विक्रम

क्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी त्याच्या बॅटमधून अजूनही तशाच आक्रमक रन होत आहेत.

क्रिस गेलचं शतक, टी-२०मध्ये सर्वाधिक स्कोअर, सिक्सचा विक्रम

मुंबई : क्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी त्याच्या बॅटमधून अजूनही तशाच आक्रमक रन होत आहेत. सीपीएलमध्ये क्रिस गेलने ६२ बॉलमध्ये ११६ रनची खेळी केली आहे. पण या खेळीनंतरही गेलची टीम जमैका थलावाजचा पराभव झाला. या मॅचमध्ये विक्रमी ३७ सिक्स मारले गेले.

जमैका थलावाज आणि सेंट किट्स ऍण्ड नेव्हिस पॅट्रियट्स यांच्यात झालेल्या या मॅचमध्ये एकाच दिवशी दोन सर्वाधिक स्कोअरचा विक्रमही मोडला गेला. गेलचं टी-२० क्रिकेटमधलं हे २२वं शतक होतं. टी-२०मध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर आहे.

जमैका थलावाजने पहिले बॅटिंग करताना २४१ रन केले. यामध्ये गेलने ११६ आणि चाडविक वॉल्टनने ३६ बॉलमध्ये ७३ रन केले. गेलने ७ फोर आणि १० सिक्स तर वॉल्टनने ३ फोर आणि ८ सिक्स मारले. गेल आणि वॉल्टनच्या फटकेबाजीमुळे जमैकाने सीपीएलमधला सर्वाधिक स्कोअर केला. पण पुढच्या दीड तासामध्येच हा विक्रम मोडला गेला.

सेंट किट्सने १८.५ ओव्हरमध्ये २४२ रन करून आणि ६ विकेट गमावून ही मॅच जिंकली. डेवॉन थॉमसने ४० बॉलमध्ये ७१ रनची खेळी केली. तर एव्हीन लुईसने १८ बॉलमध्ये ५३ रन केले. या खेळीबद्दल लुईसला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. लॉरी इवान्सने २० बॉलमध्ये ४० रन आणि फॅबियन एलनने १५ बॉलमध्ये ३७ रन केले.

या मॅचमध्ये जमैकाने २१ सिक्स आणि सेंट किट्सने १६ सिक्स लगावले. यामुळे एका टी-२० मॅचमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या विक्रमाचीही बरोबरी झाली. मागच्यावर्षी बाल्ख लिजेंड्स आणि काबुल ज्वाननच्या टीममध्ये झालेल्या मॅचमध्येही ३७ सिक्स मारले गेले होते.

Read More