Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

न्यायालयाच्या समितीने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला फटकारलं

 न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीनं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला फटकारलय. 

न्यायालयाच्या समितीने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला फटकारलं

मुंबई : न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीनं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला फटकारलय. लोढा समितीनं सूचवलेले बदल अंगिकारण्याचा ७ मेच्या सभेमध्ये एकमुखाने निर्णय घेऊनसुद्धा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं अचानक घूमजाव केलं. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला खरमरीत ई मेल लिहून नियमांचे पालन करा, अथवा होण्या-या परिणाम भोगायला तयार रहा असा स्पष्ट इशारा दिला आहे. 

प्रशासकीय समितीने घटनेत केलेले बदल तपासण्याकरता नवीन घटनेची प्रत देण्याची सूचना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला केली होती. ती प्रत पाठवण्याच्या अगोदरच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं निवडणुका जाहीर करुन टाकलेला नो बॉल प्रशासकीय समितीला अजिबात रुचला नाही. त्यामुळेच समितीनं एमसीएला फटकारलं आहे.

Read More